घरमुंबईनिंबवलीला डॉक्टर मिळेना

निंबवलीला डॉक्टर मिळेना

Subscribe

दवाखान्यात गुरे बांधण्याचे आंदोलन

वाडा तालुक्यातील निंबवली या दुर्गम गावात वैद्यकीय पथकात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेने गावातील बंद असलेल्या दवाखान्यात गुरे बांधण्याचे आंदोलन केले. मात्र, ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जाण्यास तयार नसल्याने आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे.

निंबवली परिसरातील जवळपास आठ हजार लोकसंख्या असलेल्या दुर्गम गाव-पाड्यांसाठी वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी निंबवलीत दवाखाना उघडण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने गावकरी वैद्यकीय सेेवेपासून वंचित आहेत. वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य पथकाचे कामही ठप्प झाले आहे. मागणी करूनही वैद्यकीय अधिकारी नसल्याचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने येथील बंद खोल्यांमध्ये गुरे बांधून आंदोलन केले. पाच तासाच्या आंदोलनानंतर आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी देऊ, असे लेखी आश्वासन दिले.

- Advertisement -

याठिकाणी वैद्यकीय अधिकारी रुजू होण्यास तयार नाहीत. तरीही दोन दिवसात कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी दिला जाईल.
-डॉ. संजय बोरपुल्ले, तालुका आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -