घरCORONA UPDATEमुंबईतलं मोठं रुग्णालय सील; ३ डॉक्टर, २६ नर्सेसना कोरोनाची लागण!

मुंबईतलं मोठं रुग्णालय सील; ३ डॉक्टर, २६ नर्सेसना कोरोनाची लागण!

Subscribe

देशभरात कोरोनाचा फैलाव होऊ लागला असून मुंबईत देखील वेगाने या व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढा देण्यासाठी इथली आरोग्ययंत्रणा सज्ज असणं नितांत आवश्यक असताना आता मुंबईतलं एक मोठं रुग्णालय सील करण्यात आलं आहे. मुंबईतलं वॉकहार्ट हे खासगी रुग्णालय विविध प्रकारच्या आजाराच्या रुग्णांना उपचार देत आहे. त्यातही ह्रदयरोगावर इथे उपचार केले जातात. मात्र, आता या रुग्णालयातल्याच ३ डॉक्टर आणि तब्बल २६ नर्सेसला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हे संपूर्ण रुग्णालयच सील करण्यात आलं आहे. या रुग्णालयाच्या आसपासचा भाग देखील कंटेनमेंट भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.

कोरोनाची लागण झालीच कशी?

या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू नाहीत. त्यामुळे नक्की या रुग्णालयातल्या डॉक्टरांना आणि नर्सेसला कोरोनाची लागण कशी झाली? असा प्रश्न पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला पडला आहे. या पार्श्वभूमीवर हे शोधून काढण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराच्या पार्श्वभूमीवर रूग्णालयात सध्या असलेल्या २७०हून अधिक रुग्ण आणि नर्सेसच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सगळ्यांचे अहवाल येईपर्यंत रुग्णालयात कुणालाही सोडलं जात नाहीये किंवा आतून बाहेर कुणाला येऊ दिलं जात नाहीये.

- Advertisement -

दरम्यान, डॉक्टर आणि नर्सेसला कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण हॉस्पिटलच सील करण्याचा हा पहिलाच प्रकार असून त्यामुळे आसपासच्या भागात चिंतेचं वातावरण आहे. तसेच, गेल्या काही दिवसांमध्ये या रुग्णालयात उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांची देखील तपासणी करण्याच्या संदर्भात प्रशासन विचार करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -