घरमुंबईउग्र दर्पाने डोंबिवलीकर हैराणच; मनसेचा खळखट्याक आंदोलनचा इशारा

उग्र दर्पाने डोंबिवलीकर हैराणच; मनसेचा खळखट्याक आंदोलनचा इशारा

Subscribe

या उग्र दर्पामुळे डोंबिवली नागिकांना श्वसनाच्या तक्रारी वाढल्या.

गेल्या काही दिवसांपासून शहरात रासायनिक वायूमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले असतानाच मंगळवारी मध्यरात्री पासून पसरलेल्या उग्र दर्पामुळे डोंबिवलीकर प्रचंड हैराण झाले. उग्र दर्पामुळे नागरिकांना श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. या प्रकारानंतर मनसैनिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर धडक देत प्रदूषित कंपन्यांवर तातडीने कारवाई न केल्यास खळखट्याकचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मनसेने तोंडाला मास्क लावून एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा नेहमीप्रमाणे कानावर हात

डोंबिवलीतील एमआयडीसी आणि त्याचे प्रदूषण हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. बुधवारी पहाटेपासून डोंबिवली एमआयडीसीसह पूर्व-पश्चिम ठाकुर्ली आदी भागात उग्र दर्प येत होता. त्यामुळे अनेक नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास झाला. हा उग्र दर्प नेमका कशामुळे आणि कुठून येत होता याची माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपनीतून हा वायू सोडल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागील आठ-पंधरा दिवसांपासून रोज सकाळी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले आहेत.

- Advertisement -

मनसे स्टाईलने आंदोलन करणाच्या इशारा

महापालिकेकडून खाडीत सोडल्या जाणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे थंडीच्या काळात सकाळच्या वेळी दुर्गंधी पसरत असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, थंडीमुळे दुर्गंधी वाढत असेल तर मागील दोन वर्षांत इतका त्रास का नव्हता, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी डोंबिवली शहर मनसेने एमपीसीबी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. लवकरात लवकर वायू प्रदूषणाचा मुद्दा सोडवावा अन्यथा आमच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला. तसेच डोंबिवलीतही एमपीसीबीचे कार्यालय सुरू करण्याची मागणी मनसेने केली आहे. यावेळी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, मनसे गटनेते मंदार हळबे, प्रथमेश खरात, वेद पांडे, सचिन कस्तुर, विशाल बडे, विशाल बडे हर्षद राजे-देशमुख, मनसेचे शहर सचिव सचिन कस्तुर, शैलेंद्र सज्जे व इतर सहकारी उपस्थित होते.


हेही वाचा गुडविनचे गुंतवणूकदार हवालदील, थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -