घरताज्या घडामोडीडोंबिवली प्रदूषण: हिरव्या पावसानंतर आता रस्ताही झाला गुलाबी

डोंबिवली प्रदूषण: हिरव्या पावसानंतर आता रस्ताही झाला गुलाबी

Subscribe

शहरातील रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणाची समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. काही वर्षापूर्वी डोंबिवली हिरवा पाऊस ऑरेंज ऑईल मिश्रीत पाऊस पडला असतानाच आता केमिकलमुळे एमआयडीसीतील रस्ताही गुलाबी झाला आहे. त्यामुळे पून्हा एकदा प्रदूषणाची समस्या ऐरणीवर आली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांतून सोडला जाणाऱ्या प्रदूषणाच्या उग्र वासामुळे डोंबिवलीकर त्रस्त आहेत. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येविरोधात नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन केली आहेत. मात्र तरीसुध्दा प्रदूषणाच्या समस्येतून नागरिकांची सुटका होऊ शकलेली नाही.

उग्र दर्पामुळे नागरिकांना श्वास गुदमरने, घशाचे विकार, डोळे चुरचुरने आदी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर केमिकल मुळे एमआयडीसीतला रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. त्यामुळे यावरून एकच चर्चा रंगली असून प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

- Advertisement -

हा गुलाबी रंग अजून काही रस्त्यांवर दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आलं आहे. कंपन्यांमध्ये वापरण्यात येणारे वेस्टेज केमिकल रॉ मटेरियल कंपनीच्या बाहेर रस्त्यावर ठेवले जाते. सध्या एमआयडीसीकडून गटारे आणि नाले बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जेसीबीद्वारे हे केमिकल रस्त्यावर पसरले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच हा रस्ता गुलाबी झाला आहे, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र वेस्टेज केमिकल रॅा मटेरियल रस्त्यावर ठेवणे कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित हेात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -