घरमुंबईडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख तर जखमींना ५० हजाराची मदत -...

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख तर जखमींना ५० हजाराची मदत – मुख्यमंत्री

Subscribe

मुंबईतील डोंगरी परिसरात काल कोसळलेल्या केसरबाई इमारतीतील मृत आणि जखमींना शासनाने मदत जाहीर केली आहे.

मुंबईतील डोंगरी परिसरात काल कोसळलेल्या केसरबाई इमारतीतील मृत आणि जखमींना शासनाने मदत जाहीर केली आहे. ये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली जाणार आहे. तर हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या जखमींचा संपूर्ण खर्च हा सरकारतर्फे केला जाईल, असेदेखील त्यांनी सांगितले आहे. काल, १६ जुलै रोजी डोंगरीत चार मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत अद्याप १४ जणांचा मृत्यू झाला असून २३ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे. या परिसरात अजूनही एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य केले जात आहे.

- Advertisement -

बचावकार्य अजूनही सुरु

मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई ही चार मजली इमारत काल, १६ जुलै रोजी कोसळली असून आज सकाळपर्यंत या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर ९ जण जखमी झाल्याची माहित एनडीआरएफने दिली आहे. या ठिकाणी दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली आणखी काही लोकं अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा किंवा जखमींचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंत २३ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात एनडीआरएफ टीमला यश आले आहे.

काय आहे घटना 

मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगरीच्या बाबा गल्लीत चार मजली इमारत कोसळली आहे. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. यानंतर अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -