घरमुंबईमहापरिनिर्वाण दिन: दादरच्या चैत्यभूमीवर जनसागर लोटला

महापरिनिर्वाण दिन: दादरच्या चैत्यभूमीवर जनसागर लोटला

Subscribe

दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, बेस्टकडून आवश्यक सोयी सुविधा करुन देण्यात आल्या आहेत.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयायी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. बुधावारी रात्रीपासूनचं राज्य आणि देशभरातील अनुयायी आले आहेत. महापालिका आणि पोलिसांकडून आवश्यक सोयी सुविधा करुन देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

समतेचे स्वप्न पूर्ण करणार

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चैत्यभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन केले. देशाला डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशामध्ये समतेचे राज्य स्थापन करण्याचा संदेश दिला आहे. महाराष्ट्र सरकार देखील बाबासाहेबांचे विचार आणि संविधानावर काम करत आहे. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

बाबासाहेबांचे विचार पोहचवण्याचा प्रयत्न

चैत्यभूमीच्या बाहेर पुस्तकांचे स्टॉल, बाबासाहेब आणि गौतम बुद्धांच्या मूर्तींचे स्टॉल, कीचेन आणि फोटोचे स्टॉल लावण्यात आले आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य आणि त्यांच्याशी निगडित साहित्य अनुयायांना विकत घेता यावे, म्हणून शिवाजी पार्क येथे अनेक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरुन आलेल्या तरुणांकडून पथनाट्य सादर केली जात आहेत.

- Advertisement -

शिवाजीपार्कमध्ये राहण्याची सोय 

चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथेही अनुयायींसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाजीपार्कमध्ये निवाऱ्याची सोय करण्यात आली आहेत. तसंच शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्या ७ शाळांमध्ये देखील निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा – 

एप्रिल 2020 पर्यंत बाबासाहेबांचे स्मारक अशक्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -