घरमुंबईनायरमधील तीन आरोपी डॉक्टरांना २ लाखांचा जामीन

नायरमधील तीन आरोपी डॉक्टरांना २ लाखांचा जामीन

Subscribe

मुंबईबाहेर जाण्यास ,हॉस्पिटल परिसरात फिरकण्यास बंदी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी शुकवारी सशर्थ जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने त्यांची सुटका केली असून, मुंबईबाहेर जाण्यास तसेच नायर हॉस्पिटल परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.

पद्व्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणार्‍या डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी नायर हॉस्पिटलातील वसतिगृहात तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. पायल हिच्या वरिष्ठ सहकारी डॉ. हेमा अहुजा (वय २८), डॉ. अंकिता खंडेलवाल (वय २७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) यांनी तिच्यावर जातीवाचक शेरेबाजी केली. तसेच रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने तो जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

- Advertisement -

२३ जुलै रोजी कोर्टाने आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी २५ जुलैपर्यंत तहकूब केली होती. त्यानंतर ३० जुलै रोजी कोर्टाने सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली होती. कोर्टात शुक्रवारी पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना कोर्टाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीनावर सुटलेल्या आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई करतानाच, त्यांनी दिवसाआड गुन्हे विभागासमोर हजेरी लावावी, असे निर्देशही दिले आहेत. यादरम्यान आरोपी डॉक्टरांना नायर हॉस्पिटल किंवा आग्रीपाडामध्ये जाण्यास कोर्टाने मनाई केली आहे.

आरोपी डॉक्टरांनी नष्ट केली सुसाईड नोट?
पोलिसांना पायलच्या मोबाईलमध्ये तिच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली सुसाईड नोट सापडली. डॉ. पायल हिने या नोटचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. त्यामुळे आरोपी महिला डॉक्टरांनीच पायलने लिहिलेली सुसाईड नोट नष्ट केली असण्याच्या दाव्याला बळ मिळाले आहे. या सुसाईड नोटमध्ये पायलने तिघा महिला डॉक्टरांच्या त्रासाबद्दल सर्वकाही लिहिले आहे. ‘या तिघींनी विभागातील ए.एच.ओ. विभागप्रमुख आणि प्राचार्य यांच्यासमोर आमची चुकीची प्रतिमा तयार केली होती. अनेक वेळा मॅडमकडे तक्रार करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मला यातून कुठलाही मार्ग दिसत नाही, दिसतोय तो फक्त शेवट’ अशा भावनिक आणि निर्वाणीच्या शब्दांमध्ये पायलने आपली व्यथा या नोटमध्ये लिहिली आहे.

- Advertisement -

जातीवरून एखाद्याला कमी लेखणार्‍या अशा प्रवृत्तीच्या लोकांना जन्माची अद्दल घडायला हवी, कारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी मुंबई येऊन शिकण्यासाठी धडपडत असतात. मात्र अशा घटनांमुळे त्यांचे खच्चीकरण होता कामा नये. तसेच या तीनपैकी दोन आरोपी अकोला आणि अमरावती तर एक मध्यप्रदेशातील सतना भागातून आहे. मग त्यांनीही आपल्याच एका सहकार्‍याबद्दल इतका आकस का ठेवावा? असा सवाल न्यायमूर्ती साधना जाधव यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -