घरमुंबईआरोग्य विभागाच्या संचालकपदी डॉ. साधना तायडे

आरोग्य विभागाच्या संचालकपदी डॉ. साधना तायडे

Subscribe

राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकपदी डॉ. साधना तायडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकपदी डॉ. साधना तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य संचालक पद हे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होतं. त्यामुळे, सोमवारी अखेर या पदावर डॉ. तायडे यांची नियुक्ती झाली आहे. या पदासाठी दहा अर्ज आलेले होते. अनेक डॉक्टरांनी या पदासाठी परीक्षा दिली होती. यातून डॉ. साधना तायडे यांची निवड करुन अखेर त्यांनी सोमवारी पदभार स्विकारला आहे.

डॉ. तायडे यांनी कार्यभार स्विकारला

आरोग्य विभागाच्या संचालक पदाच्या नियुक्तीसाठी एमपीएससी अंतर्गत परिक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून अंतिम फेरीसाठी दहा जणांची निवड झाली होती. माजी संचालक डॉ. संजीव कांबळे यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे पद गेले सहा महिने रिक्त होते. त्यामुळे, संचालकांच्या अपरोक्ष आरोग्य संचालनालयाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांच्यावर कामाचा ताण वाढत होता. पण, अखेर संचालक म्हणून डॉ. तायडे यांना हा कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉ. साधना तायडे याआधी आरोग्य सेवा संचालनालयाच्या असंसर्गजन्य रोग विभागाच्या सह संचालिका म्हणून काम पाहत होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याच्या आरोग्य विभागाचेच आरोग्य धोक्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -