घरमुंबईकरोनाचा धसका, सार्वजनिक कार्यक्रमांना 'नो' परमिशन

करोनाचा धसका, सार्वजनिक कार्यक्रमांना ‘नो’ परमिशन

Subscribe

करोना विषाणूंचे संक्रमण राेखण्यासाठी देशभरात सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना "नो" परमिशन केले आहे.

करोना विषाणूंचे संक्रमण राेखण्यासाठी देशभरात सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनेही उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजिक कार्यक्रमे रद्द करून पुढे ढकलण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सामाजिक संस्था व मंडळांना केले आहे. तसेच पोलिसांनीही सर्वाजनिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नये यासंदर्भात पोलिसांना सुचना देण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच जिल्हाधिकारी म्हणून मी ही कोणत्याच कार्यक्रमांना येणार नसल्याचे यावेळी आयुक्तांनी बोलताना स्पष्ट केलं. डॉ सूर्यवंशी यांना महापालिकेच्या आयुक्त पदावर विराजमान होऊन २० दिवस झाले, मात्र अजूनही ते जिल्हाधिकारी असल्याच्या मूडमधून बाहेर आले नसल्याचे यावेळी दिसून आले.

करोना विषाणुंच्या जनजागृतीसंदर्भात पालिका आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद बोलावली होती त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, करोना आजाराला घाबरण्याचे कारण नाही मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरी आरोग्य केंद्र, रूक्मिणीबाई हॉस्पीटल, शास्त्रीनगर हॉस्पीटल तसेच खासगी हॉस्पीटल यांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या असून, शास्त्रीनगर आणि रूक्मिणीबाई या दोन्ही हॉस्पीटलमध्ये स्वतंत्र आयसोलेटेड वॉर्ड तयार करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले. सार्वजनिक कार्यक्रमात जाणं प्रत्येकाने टाळलं पाहिजे. पालिकेचा १३ माच्र रोजीचा महिला दिनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.

- Advertisement -

संयोजकांनीही यापुढील कार्यक्रम रद्द करून, ते पुढे ढकलावेत असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. तसेच पोलीसांनीही परवानगी घेण्यासाठी येणा-यांना कार्यक्रम पुढे ढकलण्यासंदर्भात सुचना कराव्यात यासाठी पोलिसांशी संपर्क साधणार असल्याचेही आयुकतांनी सांगितले. खबरदारी विषयी बोलताना आयुक्तांनी सांगिले की, सर्दी खोकला असेल तर रूमाल वापरला पाहिजे. मास्कची कोणतीही आवश्कता नाही. शिंका येत असतील तर बाहेर जाणे टाळलं पाहिजे. वारंवार साबणाने हात धुणे आवश्यक आहे. त्यासाठी सॅनिटायझरची आवश्यकता नाही. ताप, सर्दी आणि खोकला असेल तर तातडीने हॉस्पीलमध्ये जाऊन तपासणी करा. डॉक्टरांना त्यासंबधी ट्रेनिंग देण्यात आलं आहे. खासगी हॉस्पीटलमधील डॉक्टरांनाही यासंबधी ट्रेनिंग देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -