घरताज्या घडामोडीLockDown: माहिममध्ये भाजीपाला, बेकरी साहित्य घरपोच

LockDown: माहिममध्ये भाजीपाला, बेकरी साहित्य घरपोच

Subscribe

भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर-देसाई यांच्या उपक्रमाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईतील माहिम विभागामध्ये कोरोनाच्या रुग्णांचे काहीअंशी प्रमाण वाढताना दिसत असताना येथील टि.एच.कटारिया मार्ग आणि एम.एम.सी मार्ग या दोन रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात नागरिक गर्दी दिसत आहे. परंतु लोकांनी भाजीपाला आणि अन्य वस्तूंसाठी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन केले जात असले तरी लोकांकडून याचे योग्य पालन होत नाही. त्यामुळे माहिममधील भाजपच्या नगरसेविकेने भाजीपाला, फळे तसेच बेकरी साहित्य आणि इतर वस्तू घरपोच उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार प्रत्येक सोसायटी आणि वस्तींमध्ये या सुविधा उपलब्ध केल्यामुळे लोकांना लॉकडाऊनच्या काळात सोसायटीबाहेर न पडता इमारतीखालीच आवश्यक वस्तूंची खरेदी करता येत आहे.

लोकांना वस्तू सोसायटीच्या आवारात करून दिला उपलब्ध

माहिम येथील प्रभाग क्रमांक १९०च्या भाजप नगरसेविका शीतल गंभीर-देसाई यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर, अनेक मोठ्या सोसायटीतील रहिवाशांना बाहेर न जाता सोसायटीच्या आवारातच दैनंदिन भाजीपाला, पाव, बिस्कीटे, अंडी आदी वस्तूंची खरेदी करता यावी, याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भाजपच्या काळात राबवण्यात येणाऱ्या आठवडी बाजार संकल्पनेतील वाहनांची मदत घेऊन शीतल गंभीर यांनी, लोकांच्या मागणीनुसार विभागातील लोकांना या वस्तू सोसायटीच्या आवारात उपलब्ध करून दिल्या. जेणेकरून त्यांना इमारतीच्या खालीच या वस्तूंची खरेदी करता येत आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात कमीत कमी लोक रस्त्यांवर येतील यासाठी हा उपक्रम

शीतल गंभीर यांनी याबाबत बोलताना असे स्प्ष्ट केले की, एकूण दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामधून लोकांना ताजी भाजी, ब्रेड, बटर, पाव अंडीसह बिस्कीटे आदी प्रकारच्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, यासाठी या घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली जाते. लोकांच्या मागणीनुसार फिरता भाजीपाला आणि बेकरी स्टॉल्स सोसायटीत लावला जातो. तेथील लोकांनी खरेदी केल्यानंतर दुसऱ्याठिकाणी हे वाहन नेले जाते. लॉकडाऊनच्या काळात कमीत कमी लोक रस्त्यांवर येतील यासाठी हा उपक्रम राबवला जात असून याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजूबाजूच्या प्रभागातून लोकांनी मागणी केल्यास तिथेही ही गाडी पाठवून नागरिकांना सुविधा दिली जाते, असेही त्या म्हणाल्या.

माहिम येथील रिझवी हाईट्सचे पदाधिकारी रवी देशपांडे यांनी सोसायटीतील सर्व रहिवाशांच्यावतीने नगरसेविकेच्या उपक्रमाबाबत धन्यवाद मानले आहे. भाजीपाला आणि बेकरीचा फिरता स्टॉल्सची नगरसेविकेने व्यवस्था करून दिल्यामुळे सोसायटीतील लोकांना या वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जावे लागले नाही आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन सोसायटीला करता आले असे त्यांनी म्हटले. केवळ आमच्या सोसायटीतील रहिवाशांना यामुळे मदत झाली नाही तर आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना या फिरत्या स्टॉल्सचा लाभ घेता आला, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video: भयावह! माकडाने चिमुरडीला नेले फरपडत; पाहून तुम्हालाही बसेल धडकी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -