घरमुंबई‘गो-ग्रीन बाप्पा’,

‘गो-ग्रीन बाप्पा’,

Subscribe

निसर्गाच्या सेवेला भक्तीची जोड

आपला गणपती आकर्षक आणि देखणा दिसावा असे प्रत्येकाला वाटते. पण, हल्ली स्पर्धेत आपण इको फ्रेंडली बाप्पाचा जास्त विचार करत नाही. पण, मुंबईकरांमध्ये इको फ्रेंडली बाप्पाबाबत जागृती व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. ठाण्यातील संकल्पनाकार सोनाली पंकज कुंभार आणि मूर्तिकार शुभम दिनेश कुंभार हे दोघे एक चांगला उपक्रम राबवत आहेत.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनाने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळते. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक बाप्पा ही संकल्पना निर्माण झाली. कागदाचा लगदा, लाल मातीचे गणपती पाण्यात लवकर विरघळतात. नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या या मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, लाल माती आणि कागदाचा लगदा यांच्यापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात सेलिब्रिटींचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

- Advertisement -

शासनाने प्लास्टीक बंदी केल्यानंतर काही प्रमाणात का होईना प्लास्टीकला आळा बसला आहे. असे असले तरी, नागरिकांनी स्वत:हून प्लास्टीक बंदीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. तसेच, पर्यावरण रक्षणासाठी लाल मातीची, पाण्यात विरघळणार्‍या मुर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन सोनाली कुंभार करतात.

पर्यावरण संरक्षणात खारीचा वाटा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी वृक्षलागवड योजनेच्या माध्यमातून सर्व सामान्य व्यक्तीला, महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील जनतेला निसर्गाशी जोडले आहे. वनमंत्र्यांच्या ‘वन है तो जल है, जल है तो कल है, कल है तो हम है’ या अमुल्य संदेशाला प्रभावीत होऊन त्याच विचारधारेतून सोनाली पंकज कुंभार यांनी आपला खारीचा वाटा म्हणून दरवर्षी लाल मातीच्या मुर्ती तयार करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -