घरमुंबईपाणी टंचाईमुळे होऊ शकतो संतापाचा उद्रेक

पाणी टंचाईमुळे होऊ शकतो संतापाचा उद्रेक

Subscribe

भाजप शहराध्यक्षांनी व्यक्त केली भीती

सध्या ठाणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागाप्रमाणे अंबरनाथ व बदलापूर शहरातही सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास एप्रिल व मे महिन्यात पाणी समस्या वाढून नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची भीती बदलापुरचे भाजपा शहराध्यक्ष व ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सध्या ठाणे जिल्ह्यात पाणी शहरी व ग्रामीण भागाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. विविध राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींकडून याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर मोर्चे काढले जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पाणीपुरवठा होत असलेल्या अंबरनाथ व बदलापूर शहरातही अशीच परिस्थिती आहे. प्रचंड वेगाने वाढत असलेल्या या दोन्ही शहरांच्या पाण्याचे नियोजन करण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अपयशी ठरले आहे. फेब्रुवारी महिन्यात अशी अवस्था असल्याने एप्रिल-मे महिन्यात नागरिकांना पाणी टंचाईची झळ अधिक जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणी समस्येवर तात्काळ उपायोजना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी, अशी मागणी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती संभाजी शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

सात महिन्यात एकच बैठक
जिल्हा नियोजन समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होणे अपेक्षित आहे. परंतु जून महिन्यात सदस्य निवड झाल्यापासून आतापर्यंत जानेवारी महिन्यात समितीची एकच बैठक झाली आहे. या अर्थसंकल्पीय बैठकीत पाणी समस्येवर उपाययोजना करण्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. याबाबत एका विशेष सभेचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप यासंदर्भात कार्यवाही झालेली नसल्याचेही संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -