घरमुंबईकंचाडमधील व्होटींग मशीन बंद

कंचाडमधील व्होटींग मशीन बंद

Subscribe

मतदान न करताच नागरिक माघारी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान 28 मे रोजी झाले. वाडा तालुक्यातील कंचाड महसूल क्षेत्रातील 44 मतदान केंद्रे ही विक्रमगड विधानसभा मतदारसंघाशी जोडली गेली आहेत. मात्र, मतदान केंद्रातील देवघर, खुटल, ब्राम्हणगांव आणि खरिवली इथल्या गावातील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन व इव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदानाच्या टक्केवारी परिणाम होणार आहे. तर काही ठिकाणी मशीन सुरू होत नसल्याने दोन तास मतदानासाठी वाट पाहावी लागली. यामुळे काही मतदार मतदान न करताच माघारी फिरल्याने मतदान कमी झाले.

- Advertisement -

दुसरी मशीन बंद पडल्यामुळेदेखील गोंधळ

काही ठिकाणी पहिली मशीन बंद पडल्यावर पर्याय म्हणून असलेली दुसरी इव्हीएम मशीनही बंद पडल्याने मोठा गोंधळ झाल्याने मतदार नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मतदान होत असलेल्या काही गावांत मुंबई आणि ठाण्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ठाण मांडून बसले होते. त्यातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. यातील स्थानिक गावकèयांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर या पदाधिकाऱ्यांनी तेथून पळ काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

- Advertisement -

मशीन्सचा गोंधळ
या निवडणुकीच्या मतदानाकरिता वाडा पोलीस ठाण्याकडून ७२ पोलीस कर्मचारी आणि ५ पोलीस अधिकाऱ्यांची कुमक तैनात करण्यात आली होती. वाडा तालुक्यातील देवघर, खुटल आणि खरिवली गावातील मतदान केंद्रावरील इव्हीएम मशिन्स बंद पडल्याचे मतदारांनी सांगितले. तर देवघर येथे दोन तास मशीनबंद होती. येथे ७०० मतदारांपैकी १०० जणांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. तर ब्राम्हणगाव, पिंपळास येथे सकाळी दोन तास मशीन बंद होती. मशीन बंद होण्याच्या प्रकारामुळे मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -