घरमुंबईउर्मिला मातोंडकर काँग्रेसचा 'हात' सोडून बांधणार शिवबंधन?

उर्मिला मातोंडकर काँग्रेसचा ‘हात’ सोडून बांधणार शिवबंधन?

Subscribe

काँग्रेसवर नाराज होऊन पक्ष सोडलेल्या उर्मिला मातोंडकर खरच शिवसेनेच्या वाटेवर आहे का?

बॉलिवूडमधील रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यानंतर या अभिनेत्रीने राजकारणात देखील दमदार पाऊल ठेवले. मात्र काँग्रेस सोडलेल्या उर्मिला मातोंडकर या आता हाती शिवबंधन बांधणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसवर नाराज होऊन पक्ष सोडलेल्या उर्मिला मातोंडकर खरच शिवसेनेच्या वाटेवर आहे का? असे तर्कवितर्क आता लढवले जात आहेत.

- Advertisement -

दरम्यान उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेनंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिला मार्तोंडकर यांचे मराठी कलाकार म्हणून मातोश्रीशी चांगले संबध आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही उर्मिला मार्तोंडकर यांनी भाजपवर कडाडून टिका केली मात्र ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या मैत्रीपूर्ण संबधामुळे शिवसेनेवर त्यांनी कधीही टिका केली नसल्याचे त्यांनी सांगितले. मातोश्रीनेही उर्मिला मार्तोंडकर यांच्याशी मराठी लेक म्हणूनच मैत्रीचे संबध कायम ठेवले होते.


हेही वाचा – ‘मी पस्तावतोय’; बॅनरमार्फत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र ही चर्चा राजकिय नसून ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबधामुळे चर्चा झाली असल्याचा खुलासा शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी केला आहे. तसेच या भेटीला कुणीही राजकिय रंग देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -