घरमुंबईमाजी सैनिकांना मालमत्ता करमाफीची सवलत द्या

माजी सैनिकांना मालमत्ता करमाफीची सवलत द्या

Subscribe

मुंबईतील नागरिकांना ७००चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याची शिवसेना आणि भाजपने केलेल्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला असला तरी अद्यापही याची अंमलबजावणी झालेली नाही.त्यातच आता भाजपने माजी सैनिकांना मालमत्ता करमाफी देण्याची मागणी केली आहे. माजी सैनिकांच्या मुंबईतील घरांना तथा मालमत्तांना आणि माजी सैनिकांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नींना मालमत्ता करात पूर्णपणे सवलत देण्याची मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

मुंबईतील माजी सैनिकांना आणि त्यांच्या मृत्यपश्चात त्यांच्या पत्नींना मालमत्ता करात सवलत देण्याच्या मागणीचे निवेदन मनोज कोटक यांनी भाजपच्या महापालिकेतील नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवून त्यांना दिले. यासंदर्भात त्यांनी महापौरांनाही पत्र देवून ही मागणी केली आहे. कोटक यांनी या मागणीमध्ये आजही तिन्ही दलांतील सैनिक प्राण प्रणाला लावून आपल्या देशाचे त्याचप्रमाणे देशातील जनतेच्या प्राणांचे, मालमत्तेचे संरक्षण करण्याचे महत्वपूर्ण काम करत असतात. देशाला शत्रुच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी अनेक सैनिक सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देत असतात. अशा सैनिकांपैकी बर्‍याच सैनिकांचा मालमत्ता मुंबईत आहेत. त्यामुळे माजी सैनिकांना तसेच मृत पावलेल्या सैनिकांच्या पत्नींना मालमत्ता करात सवलत दिली जावी अशी मागणी कोटक यांनी केली आहे.

- Advertisement -

मुंबईत यापूर्वीही सैनिकांच्या मालमत्तांना करात माफी देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु यावर प्रशासनाने नकारार्थी उत्तर देवून ही मागणी फेटाळून लावली होती. पण पुन्हा एकदा भाजपच्या गटनेत्यांनी ही मागणी लावून धरली असून प्रत्यक्षात या सैनिकांच्या कुटुंबांना करमाफी मिळेल की ही ७०० चौरस फुटांच्या करमाफीप्रमाणेच घोषणा ठरेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -