घरमुंबईवसई, पालघरमध्ये जागतिक मराठी दिनाचा उत्साह

वसई, पालघरमध्ये जागतिक मराठी दिनाचा उत्साह

Subscribe

साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने वसईत मराठी राजभाषा दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पालघरमध्येही अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. म.ग परुळेकर शाळा आणि सेंट झेविअर शाळा नायगांव पश्चिम येथे उतारा कविता वाचन स्पर्धा झाली. साहित्य जल्लोष समन्वयक प्रतिनिधी जयंत देसले, विजय राऊत, सुरेश ठाकूर, आनंद खंडागळे यावेळी हजर होते. केएमपीडी शाळा, तुळींज, नालासोपारा, पूर्व आणि ऋषि वाल्मिकी शाळा नायगांव पश्चिम येथे प्रश्न मंजुषा स्पर्धा झाली. एम.के.शाह गुजराथी शाळा, माणिकपूर येथे कविता,उतारा वाचनाला उत्साही प्रतिसाद विद्यार्थी आणि शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक यांनी दिला. साहित्य जल्लोषचे प्रतिनिधी नगरसेविका पुष्पा संदेश जाधव, डॉ.सुप्रिया वाकणकर, शिक्षिका कविता वनमाळी यांनी परीक्षक म्हणून योगदान दिले. अशोक मुळे आणि कौतुक मुळे यांनी उपस्थिती दिली. शाह शाळेचे मुख्याध्यापक देसाई यांनी सर्वांचे स्वागत आणि उत्तम सहकार्य केले. सोपारा इंग्लिश शाळा,नालासोपारा पश्चिम, निर्मल माता,माणिकपूर येथेही कार्यक्रम झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -