घरमुंबईपश्चिम उपनगरात चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पश्चिम उपनगरात चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

दोन वेश्यादलालांना अटक तर तीन तरुणींची सुटका

पश्चिम उपनगरात चालणार्‍या एका सेक्स रॅकेटचा जुहू पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन दलालांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. योगेश अशोक गेहलोत आणि सुरजकुमार दशरथ मंडल अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून या तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

अंधेरी आणि जुहू येथील काही हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार मुली पुरविणारी एक टोळी कार्यरत आहे. ही टोळी अशा प्रकारे सेक्स रॅकेट चालवून तरुणींच्या मदतीने मोठा मोबदला मिळवून त्यातील काही हिस्सा या तरुणींना देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एक बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती. या ग्राहकाने काही तरुणींना घेऊन दलालास जूहू येथील आयरीश पार्कसमोरील देवळे रोडवरच्या एका हॉटेलमध्ये बोलाविले होते.

- Advertisement -

शनिवारी तिथे योगेश गेहलोत आणि सुरजकुमार मंडल हे तीन तरुणींना घेऊन आले होते. यावेळी पोलिसांनी हॉटेलमध्ये कारवाई करुन या दोन्ही वेश्यादलालांना अटक केली तर त्यांच्या तावडीतून तिन्ही तरुणींची सुटका केली. या तरुणींची मेडीकल करण्यात आली असून मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. दोन्ही आरोपींविरुद्ध मानवी तस्करीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -