घरमुंबईधक्कादायक: भिवंडीत कुत्र्याने लचके तोडलेले अर्भक सापडले

धक्कादायक: भिवंडीत कुत्र्याने लचके तोडलेले अर्भक सापडले

Subscribe

भिवंडीमध्ये कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. भिवंडीच्या गोदाम पट्यातील राहनाळ गावच्या हद्दीतील मुनिधारा कंपाऊंडमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगत हे अर्भक साडले. हे अर्भक स्त्री जातीचे असून कुत्र्याने या अर्भकाचे लचके तोडले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अर्भक याठिकाणी कुठून आले, कोणी फेकून दिले याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आल्याने मातृत्व लपवण्यासाठी अथवा स्त्री जातीचे असल्याने अर्भक फेकले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सदरचे मृत अर्भक माथाडी कामगार पंकज कचेर भोईर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि. कलम ३१८ अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -