घरमुंबईआधारवाडी कारागृहातील शौचालयात महिला कैदीची आत्महत्या

आधारवाडी कारागृहातील शौचालयात महिला कैदीची आत्महत्या

Subscribe

आधारवाडी कारागृहातील शौचालयात एका महिला कैदीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कैद्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात पतीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेली आरोपी पत्नी साक्षी शैलेश निमसे हिने कारागृहातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. मात्र साक्षी हिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

शिवसेना पदाधिकारी पतीच्या हत्येप्रकरणी होती अटकेत

शहापूर येथे राहणारी साक्षी हिने नातेवाईकांच्या मदतीने पती शैलेश निमसे याची २० एप्रिलला निर्घृण हत्या केली होती. शैलेश हा शिवसेनेचा उपतालुका प्रमुख असल्याने या घटनेने ठाणे जिल्हयात खळबळ उडली होती. पत्नी साक्षी हिनेच दोन ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने शैलेशची घरात गळा आवळून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भिवंडीतील एका जंगलात जाळला होता. शैलेशचे एका महिलेशी अनैतिक संबध होते. त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमीच भांडणे होत पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी साक्षीने ओळखीच्या व्यक्तींना दीड लाख रूपयाची सुपारी दिली असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर साक्षीसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

गेल्या ९ महिन्यांपासून साक्षी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत होती. दरम्यान सकाळच्या सुमारास साक्षीने कारागृहामधील सर्कल नंबर १ मधील आवारात बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात साडीच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जेलमधील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहताच गळफास घेतलेल्या अवस्थेत असलेल्या साक्षीला खाली उतरवले. तिला तातडीने उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. महिला कैदीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने कैद्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


वाचा – रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून राज्यात २ विद्यार्थिनींची आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -