घरमहाराष्ट्ररोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून राज्यात २ विद्यार्थिनींची आत्महत्या

रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून राज्यात २ विद्यार्थिनींची आत्महत्या

Subscribe

रोडरोमियोंच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीड आणि पंढरपूरमध्ये शाळेचच्या विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. बीड आणि पंढरपूरमध्ये विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे.

राज्यामध्ये महिला अत्याचार, छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कायद्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी न केल्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे आरोप सतत केले जात आहेत. राज्यामध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी छेडछाडीला कंटाळून दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोडरोमियोंच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीड आणि पंढरपूरमध्ये शाळेचच्या विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बीड विद्यार्थिनी आत्महत्या

बीड जिल्ह्यामध्ये रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथे ही घटना घडली आहे. या विद्यार्थिनीला दोन तरुण सतत त्रास देत होते. अमर तिडके आणि हनुमंत सावंत हे दोघे तिला वारंवार त्रास देत होते. या त्रासाल कंटाळून अखेर तिने आपले जीवन संपवले आहे. या घटनेप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

पंढरपूर विद्यार्थिनी आत्महत्या

तर, दुसरी घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात घडली आहे. वाखरी येथे दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले आहे. ही मुलगी वाखरी येथील आश्रमशाळेत शिकत होती. आत्महत्या केलेल्या मुलीला दोन दिवसांपूर्वी तिच्याच शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांकडून चिठ्ठी पाठवली होती. या विद्यार्थिनीच्या ऐवजी ही चिठ्ठी शिक्षकांच्या हाती लागली. शिक्षकाने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. या विद्यार्थिनीची काहीही चूक नसताना ती खूप घाबरली आणि तिचे मानसिक खचिकरण झाले. त्यानंतर या विद्यार्थिनीने शेवटी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

बांधकाम साइटवर मजूराने केली आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -