घरमुंबईदोन महिलांवर फेविक्वीकचा हल्ला

दोन महिलांवर फेविक्वीकचा हल्ला

Subscribe

गर्दीचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकात पुलावरुन चालत असताना दोन महिलांवर अक्षात इसमाने फेविक्वीकचा हल्ला केल्याची घटना घडली. गुरुवारी सकाळच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकातील पुलावरुन चालत असताना एका महिलेच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला. अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गुरुवारी सकाळच्या सुमारास या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या वेध्दांगी लवाटे गोरेगावमधून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अंधेरीला आल्या. अंधेरी स्थानकात उतरुन त्या पुलावरुन चालत होत्या. या दरम्यान कोणीतरी अज्ञाताने त्यांच्या अंगावर हा पदार्थ फेकला. हा पदार्थ अंगावर पडताच जळजळ झाल्याने त्यांनी लागलीच मेट्रोचे स्वच्छतागृह गाठले पण स्वच्छतागृहात आदीपासूनच एक महिला उपस्थित होती जिच्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला होता. एकाच पुलावर काही वेळाच्या फरकाने वेध्दांगी लवाटे आणि श्रद्धा मिस्त्री या दोन महिलांवर हा पदार्थ फेकल्याने दोघींनी तातडीने रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

गर्दीतसुद्धा महिलांवर अशा प्रकारचे हल्ले झाल्याने पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास दोन महिलांनी तक्रार दिल्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलांवर फेकण्यात आलेला पदार्थ हा फेविक्वीकसारखा असल्याने इतक्या गर्दीत तो कुणी जाणूनबून फेकला आहे का, याचासुद्धा तपास आम्ही करत आहोत, असे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -