घरमुंबईअखेर एअर इंडिया इमारतीची विक्री; ‘इतक्या’ कोटींची ऑफर

अखेर एअर इंडिया इमारतीची विक्री; ‘इतक्या’ कोटींची ऑफर

Subscribe

मुंबई : मुंबईतील नरिमन पॉईंट (Nariman Point) भागात एअर इंडिया प्रसिद्ध 23 मजली इमारती (Air India’s famous 23-storey building) लवकरच राज्य सरकारच्या मालकीची होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या इमारतीच्या अधिग्रहणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात होते, मात्र कराराची अंतिम रक्कम ठरत नव्हती. राज्य सरकाने या कराराला तत्त्वतः मंजुरी दिली होती. पण केंद्र सरकारने सर्व कार्यालये हलवून १०० टक्के इमारतीचा ताबा आमच्याकडे दिल्यावर करार प्रत्यक्षात उतरणार असल्याचे एका वरिष्ठ मंत्र्यांने सांगितले आहे.

एअर इंडियाच्या इमारतीची मालकी एआय अ‍ॅसेट्स होल्डिंग लिमिटेडकडे आहे. राज्य सरकारच्या १,६०० कोटी रुपयांच्या अंतिम ऑफरला मान्य केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची या इमारतीच्या खरेदीबाबत भेट घेतली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारला एअर इंडियाची इमारत विकण्याच्या प्रयत्नात सहकार्य करण्याची विनंती केली होती.

- Advertisement -

एका वरिष्ठ मंत्र्यांने सांगितले की, एआय अ‍ॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला तत्त्वत: विकण्यास सहमती दर्शविली आहे. पण त्या इमारतीत जीएसटी आणि आयटी विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये इतर ठिकाणी हलवल्यावर जेव्हा १०० टक्के इमारतीचा ताबा राज्य सरकारला मिळेल तेव्हाच आम्ही करारात पुढे जाऊ, असेही या मंत्र्यांने सांगितले आहे.

मंत्रालयाच्या विस्तारासाठी या इमारतीचा वापर
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार एअर इंडियाची प्रसिद्ध इमारत विकत घेण्याच्या तयारीत आहे. या इमारतीचा वापर शिंदे सरकार मंत्रालयाच्या विस्तारासाठी करणार आहे. या इमारतीची किंमत २ हजार कोटींहून अधिक आहे, परंतु राज्य सरकारला एअर इंडियाकडून ३०० कोटी रुपयांची थकबाकी देणे बाकी असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांने सांगितले आहे.

- Advertisement -

ही इमारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
मंत्रालयाजवळ एअर इंडियाची इमारत १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. आर्थिक संकटातून सामना करणाऱ्या एअर इंडियाने कंपनीने २०१८ मध्ये २३ मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही इमारत खरेदी करण्यात रस दाखवला होता. पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्तापरिवर्तनामुळे खरेदीची चर्चा पुढे जाऊ शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -