घरमुंबई..आणि सुधीर मुनगंटीवारांनी दिला विरोधकांना 'शाप'!

..आणि सुधीर मुनगंटीवारांनी दिला विरोधकांना ‘शाप’!

Subscribe

महाराष्ट्र विधानसभेमध्ये आज पावसाळी अधिवेशनादरम्यान अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी गदारोळ आणि सभात्याग करणाऱ्या विरोधकांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 'शाप' दिल्यामुळे विधानभवनात त्याची चर्चा रंगली होती.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. मात्र, यावेळी त्यांनी सर्व विरोधकांना शाप दिला. ‘विरोधी पक्षातील आमदार पुढचा अर्थसंकल्प ऐकण्यासाठी या सभागृहात नसतील’, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केलं. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली. विरोधकांनी यंदाच्या अर्थसंकल्पावर टीका केली असून बहिष्कार देखील घातला आहे. या पार्श्वभूमीवर सुधीरभाऊंनी नक्की शाप का दिला? अशी चर्चा सुरू झाली आहे.

नक्की झालं काय?

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्याच वेळी अर्थसंकल्पातल्या तरतुदी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट होऊ लागल्या होत्या. त्यावर ट्वीटरवर चर्चा देखील सुरू झाली होती. त्यामुळे ‘अर्थमंत्र्यांनी स्वत:चाच अर्थसंकल्प फोडला’ अशी टीका विरोधकांनी केली. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सभागृहात गदारोळ करत अर्थमंत्र्यांच्या माफीची मागणी करायला सुरुवात केली. अर्थसंकल्पातल्या तरतुदींचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. फक्त छगन भुजबळ सभागृहात राहिले.

- Advertisement -

वाचा सविस्तर – ‘अर्थमंत्र्यांनी स्वत:च्या ट्विटरवर फोडला राज्याचा अर्थसंकल्प’

‘हे सभागृहात दिसणार नाहीत!’

दरम्यान, विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी टीकात्मक वक्तव्य केलं. ‘जे आमदार अर्थसंकल्पीय भाषणातून उठून बाहेर गेले, ते पुढचा अर्थसंकल्प ऐकण्यासाठी सभागृहात नसतील, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो’, असं मुनगंटीवार म्हणाले. यानंतर काही वेळातच छगन भुजबळ देखील वैतागून सभागृहाबाहेर पडताना दिसले. त्यामुळे विधानभवनात सुधीर मुनगंटीवारांच्या या ‘शापा’ची चर्चा भलतीच रंगली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -