घरमहाराष्ट्र'अर्थमंत्र्यांनी स्वत:च्या ट्विटरवर फोडला राज्याचा अर्थसंकल्प'

‘अर्थमंत्र्यांनी स्वत:च्या ट्विटरवर फोडला राज्याचा अर्थसंकल्प’

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप.

विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एका बाजूला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडत असताना, त्याच्या आधीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटर अर्थसंकल्पाचे मुद्दे तयार ग्राफीक्ससह प्रसिद्‌ध झाल्याने विधानपरिषदेत गोंधळ उडाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे सभापतींवर अर्थ संकल्पाचे वाचन करणाऱ्या अर्थ राज्य मंत्री केसरकर यांचे भाषण दहा मिनिटांसाठी थांबविण्याची नामुष्की आली.

- Advertisement -

या प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले,‘आज सभागृहात राज्याचे अर्थमंञी हे सभागृहात अर्थसंकल्प मांडत असतानाच अर्थसंकल्पाबाबत ट्विटरवर याबाबत प्रतिक्रीया येऊ लागल्या तसेच जाहिराती प्रकाशित होऊ लागल्या. याचाच अर्थ असा की, राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वीच तो फुटला. हा सभागृहाचा व सभागृतील सर्व सदस्यांचा अपमान आहे. इतिहासात यापूर्वी अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नाही. याशिवाय हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक आचारसंहितेपूर्वी लोकांना दाखविण्यात आलेले गाजर आहे. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही सभागृहातून वॉक आऊट केला.’


तुम्ही हे वाचलंत का? – ..आणि सुधीर मुनगंटीवारांनी दिला विरोधकांना ‘शाप’!

सभापतींविरोधात अविश्वास ?

अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करून विरोधक आक्रमक झाले, त्यानंतर सर्व सभासदांना सभापतींच्या दालनात बोलविण्यात येऊन त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतरच अर्थ राज्यमंत्र्यांचे अर्थसंकल्प वाचन पुन्हा सुरू झाले.  अर्थसंकल्प फुटल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी सदस्यांनी केली. दरम्यान अर्थसंकल्प मांडताना सभापतींनी अर्थ राज्य मंत्र्यांचे भाषण थांबवले. हे इतिहासात प्रथमच घडले आहे. त्यामुळे आम्ही सभापतींवर अविश्वास ठराव मांडणार आहोत असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान अर्थसंकल्प फुटल्याच्या विरोधकांच्या आरोपावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे भाषण मध्येच थांबवून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. अर्थमंत्री फुटलेला नसून विरोधकांनी नव माध्यमे समजून घ्यायला हवी असा खुलासेवजा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -