घरमुंबईकचरा पेट्यांच्या खरेदीत महापालिकेला आर्थिक फटका

कचरा पेट्यांच्या खरेदीत महापालिकेला आर्थिक फटका

Subscribe

महापालिकेचा फायदा होत असला तरी मागील खरेदीत प्रत्येक पेटीमागे साडेतिनशे रुपये अधिक लाटत या कंपनीने महापालिकेचे पावणे दोन कोटी रुपये लुटल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्था तसेच वस्त्यांमधील कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्या पुरवण्यात येत आहे. परंतु या कचरा पेट्यांच्या खरेदीत उत्पादन करणाऱ्या कंपनीलाच प्राधान्य देत यापूर्वी झालेल्या कंत्राट कामांमध्ये तब्बल पावणे दोन कोटी रुपये संबंधित कंपनीला दिल्याची बाब समोर आली आहे.

महापालिकेला कचरा पेट्यांचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीने तीन वर्षांपूर्वी  १७९१ दराने केला होता. परंतु नव्याने खरेदी करण्यासाठी मागवलेल्या निविदेत याच कंपनीने ही कचरा पेटी १४२५ रुपयांना देवू केली आहे. त्यामुळे यंदा महापालिकेचा फायदा होत असला तरी मागील खरेदीत प्रत्येक पेटीमागे साडेतिनशे रुपये अधिक लाटत या कंपनीने महापालिकेचे पावणे दोन कोटी रुपये लुटल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने २०१७मध्ये निलकमल लिमिटेड कंपनीकडून २४० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी केली. या कंपनीकडून १७९१ रुपये दराने ५० हजार कचरा पेट्यांची खरेदी केली. या कंत्राटाचा कालावधी जुलै २०१९ला संपल्याने महापालिकेने मागील एप्रिल महिन्यानत नव्याने निविदा मागवली. या निविदेतही निलकमल कंपनी पात्र ठरली. या कंपनीने २४० लिटर क्षमतेच्या याच कचरा पेट्यांसाठी १४२५ रुपयांची बोली लावून काम मिळवले. त्यामुळे एकूण  ५० हजार कचरा पेट्यांसाठी या कंपनीला ७ कोटी १२ लाख रुपयांचे कंत्राट दिले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत महापालिकेचा १ कोटी ८२  लाख रुपयांचा फायदा होत असल्याचे चित्र घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी रंगवत असले तरी प्रत्यक्षात मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कमी बोली लावतानाच मागील खरेदीत घनकचरा विभागाने निलकमल कंपनीला १ कोटी ८२ लाख रुपयांचा फायदा करून दिला. किंबहुना निलकमल कंपनीने महापालिकेला जास्त दराने पेट्यांची विक्री करून पावणे दोन कोटी रुपये अधिक लुटल्याची बाब समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -