घरमुंबई'पूरपरिस्थिती, कोरोना संकटामुळे न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० नोव्हेंबरपर्यंत घेणार'

‘पूरपरिस्थिती, कोरोना संकटामुळे न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० नोव्हेंबरपर्यंत घेणार’

Subscribe

मुंबईसह राज्यातील विद्यापीठांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर परिस्थिती, तांत्रिक कारण अथवा कोविडमुळे झाल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लागू केलेल्या विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ठाकरे सरकारने कार्यवाही सुरू केल्याची माहिती सामंतांनी दिली.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अतिवृष्टी, पूर, कोरोना संसर्ग या कारणांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नव्हत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर परिस्थिती, तांत्रिक कारण अथवा कोविडमुळे झाल्या नाहीत त्या परीक्षा १० नोव्हेंबर पर्यंत घेतल्या जातील, असे सामंतांनी सांगितले. यूजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस सरकारच्या काळातील लागू केलेल्या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मी टेन्शन फ्री, आता इतरांना टेन्शन : खडसेंचा भाजप नेत्यांना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -