घरमुंबईमोबाईल अ‍ॅपवर शोधा इलेक्ट्रिक चार्जिंग

मोबाईल अ‍ॅपवर शोधा इलेक्ट्रिक चार्जिंग

Subscribe

राज्यात महामार्ग, एक्सप्रेस हायवेसाठी सुविधा

राज्यातील प्रमुख महामार्ग तसेच मुख्य रस्त्यांवर इलेक्ट्रिक चार्जिंगचा पर्याय आता मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गांवर येत्या काळात बसविण्यात येणार्‍या चार्जिंग स्टेशनची उपलब्धतता कळण्यासाठी महावितरणकडून हा पर्याय देण्यात येणार आहे.राज्यात महावितरणकडून प्रायोगिक तत्त्वावर ५० सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १० स्टेशनच्या उभारणीचे काम महावितरणने हाती घेतले आहे. महावितरणने आतापर्यंत नागपूर आणि पुणे याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या उपलब्धततेनुसार आणि मागणीनुसार चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येईल.

राज्यात पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद यासारख्या शहरातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीनुसार याठिकाणी चार्जिंग स्टेशन येत्या दिवसात उभारण्यात येतील. सध्या एक चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी सरासरी २.५६ लाख इतका खर्च येत आहे. सबस्टेशनपासून वीज वाहिनीचा खर्च तसेच बांधकामाचा खर्च अशी रचना चार्जिंग स्टेशनसाठी गरजेची आहे. महावितरणच्या सबस्टेशनच्या जागेचाच वापर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी करण्यात येणार आहे. मोबाईल अ‍ॅपच्या फीचरमुळे हे चार्जिंग स्टेशन कुठे आहेत याची माहिती सहज मिळणे शक्य होईल. महावितरणच्या सध्याच्या अ‍ॅप्लिकेशनपेक्षा स्वतंत्र असे अ‍ॅप्लिकेशन महावितरणकडून तयार करण्यात येईल, असे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

रिअल टाईम स्टेटस
महावितरणच्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी वाहन चार्ज करता येईल का, याची रिअल टाईम माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रत्येक स्टेशनवर गाडी चार्ज होत आहे किंवा त्याठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे यासारखी माहिती अ‍ॅपवर सतत अपडेट होत राहील. त्यामुळे वाहन चालकांना इतर ठिकाणच्या चार्जिंगच्या पर्यायाचा वापरही करता येईल. अ‍ॅपमुळे दोन चार्जिंग स्टेशनमधील अंतर शोधणेही सोपे होईल.

इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी विशेष वीजदर
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी विशेष वीजदर जाहीर केला आहे. प्रति युनिट ६ रूपये दराने याठिकाणी गाडी चार्जिंग करता येणार आहे. रहिवासी संकुल, औद्योगिक तसेच वाणिज्यिक परिसरातही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणीचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरण व्यतिरिक्त इतर कोणत्याही परिसरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -