घरमुंबईमुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल!

Subscribe

आपल्याविरुद्धच्या तक्रारीचा राग मनात ठेवून शिवसनेचे पदाधिकारी सागर उटवाल याने सरिता खानचंदानी यांच्यारुद्ध सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या.

उत्सवांदरम्यान होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध उल्हासनगरच्या सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी नेहमीच लढा देत असतात. मात्र, सरिता यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्या शिवसेना शहर संघटक सागर उटवाल आणि अन्य दोन व्यक्तींच्या विरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उटवाल हा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा खास माणूस म्हणून ओळखला जातो. उल्हासनगरच्या सपना गार्डन जवळ सागर उटवाल याने नवरात्री दरम्यान मोठा पंडाल टाकला होता . हा पंडाल मुख्य रस्त्यावरच असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. या संदर्भात सरिता खानचंदानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात ठेवून सागर उटवाल याने सरिता खानचंदानी यांच्याविरुद्ध फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या व त्यांच्या विरुद्ध बदनामीकारक मचकूर लिहला. त्याचबरोबर उटवाल याचे सहकारी सागर भिंगारदिवे व दिलीप वलेचा यांनी उटवाल याच्या पोस्ट शेअर केल्या होत्या.
या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी सागर उटवाल, सागर भिंगारदिवे दिलीप वलेचा यांच्याविरुद्ध काल उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अंबरनाथ येथे शिवमंदिर फेस्टिव्हल दरम्यान मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक खासदार डॉ श्रीकांत शिंदे व स्थानिक शिवसेना नेत्यांच्या विरुद्ध खानचंदानी यांनी न्यायालयाचा अवमान याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यालयासमोर शिंदे यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले होते. केवळ याच कार्यक्रमाबद्दल नव्हे तर उल्हासनगर मधील गोल मैदान येथे एका सत्संगच्या कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण, अंबरनाथ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळेस फटाक्यांची आतिषबाजी , मस्जिदच्या लाऊडस्पीकर वरून होणारे ध्वनीप्रदूषण या संदर्भात खानचंदानी यांनी तक्रारी केल्या आहेत . ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या गाईडलाईन्सचे का पालन होत नाही असा जाब तत्कालीन पोलीस उपायुक्त आणि स्थानिक पोलीस निरीक्षक यांना विचारीत त्यांना देखील न्यायालयात खेचले होते .
माझी लढाई कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही, उत्सवाच्या नावाखाली होणारे ध्वनिप्रदूषण, बेकायदेशीर गोष्टी ज्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो त्यांच्याविरुद्ध माझी लढाई आहे. १४ ऑक्टोबर पासून मी सागर उटवाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध मी पोलिसात तक्रारी करीत आहे. पोलीस उपायुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, पोलीस संचालक यांच्याकडे तक्रारीचा पाठपुरावा करीत आहे.
– सरिता खानचंदानी, सामाजिक कार्यकर्त्या, उल्हासनगर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -