घरमुंबईकाँग्रेसची पहिली यादी तयार

काँग्रेसची पहिली यादी तयार

Subscribe

लवकरच होणार १४ नावांची घोषणा, एकूण ६० जणांचे नाव निश्चित

आगामी विधानसभेसाठी काँग्रेसने आपली जय्यत तयारी सुरु केली असून आघाडीचे सूतेवाच नुकतेच देण्यात आल्यानंतर आता काँग्रेसने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जवळपास ११० जागा लढविणार असून त्यापैकी सुमारे १०० उमेदवारांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आपलं महानगरच्या हाती आली आहे. या अंतिम उमेदवारांपैकी पहिली यादी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या या अथवा तिसर्‍या आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय काँग्रसच्या हायकंमाडतर्फे घेण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांची विशेष बैठक पार पडली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींबरोबर पार पडलेल्या या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि हुसेन दलवाई यांच्यासह महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. या बैठकीत वरील निर्णय झाला असून या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती देखील निश्चित करण्यात आली आहे. यासाठी एक विशेष बैठक १० सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार असून त्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १०० जागा लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर उर्वारित ८० जागांवर चर्चा सुरु असून त्या कोणाला द्यायच्या याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. साधारणपणे १४ सप्टेंबरला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात ६० नावांची घोषणा करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे बोलले जात आहे. तर बहुतांश जागांसाठी एक अर्ज आले असून इतर काही जागांसाठी दोन अर्ज आहेत, त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी हाती आली आहे.

एकनाथ गायकवाड मुंबई अध्यक्षपदी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी देखील मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. अखेर काँग्रेस हायकंमाडने देवरा यांचा राजीनामा मंजूर केला असून त्यांच्या जागी माजी खासदार एकथान गायकवाड यांची निवड केली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे के.सी. वेणुगोपाल यांनी या नावाची घोषणा शुक्रवारी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -