घरमुंबईखेड्यापाड्यात अवयवदानाच्या जागृतीसाठी पदयात्रा

खेड्यापाड्यात अवयवदानाच्या जागृतीसाठी पदयात्रा

Subscribe

१२ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर

मुंबई : मुंबईसह खेड्यापाड्यातही लोकांपर्यंत अवयवदानाचे महत्त्व पोहोचावे या उद्देशाने ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ या संस्थेमार्फत मराठवाड्यात अवयवदान पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेत मुंबईतील अवयवदान प्रचारक सहभागी होणार आहेत. १२ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१८ या काळात औरंगाबाद ते मराठवाडा अशी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर असा या पदयात्रेचा मार्ग असल्याचे ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅन्ड बॉडी डोनेशन’चे सदस्य संदीप देशपांडे यांनी सांगितले.

या पदयात्रेचा एकूण प्रवास ६७१ किमीचा आहे. पदयात्रा ३८ ठिकाणी थांबणार आहे. मुख्य उद्दिष्ट फक्त एकच आहे ते म्हणजे खेड्यापाड्यातील लोकांनीदेखील अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आतापर्यंत अनेक पदयात्रा किंवा जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा १२ ते १९ डिसेंबर दरम्यान पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रेदरम्यान ज्या ज्या ठिकाणी सहज शक्य होईल अशा चावडीवर, रोटरी क्लब, लायन्स क्लब किंवा शाळा कॉलेजांमधून अवयवदानाचे प्रबोधन केले जाते. याआधी ही नाशिकमध्ये पदयात्रा काढण्यात आली होती. तर, जानेवारी महिन्यात मुंबईहून गोव्याला पदयात्रा काढून अवयवदानाबाबत माहिती दिली गेली होती.

- Advertisement -

भारतात दहा लाख लोकांच्या मागे केवळ ०.८ टक्के अवयवदान होते. अवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचावे, यासाठी ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅन्ड बॉडी डोनेशन’ ही संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. १२ नोव्हेंबरला सुरू करण्यात येणार्‍या या पदयात्रेमध्ये मराठवाड्यातील प्रत्येक गावागावात जाऊन अवयवदानाबाबत लोकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -