घरमुंबई'त्या' बछड्याला आईची प्रतिक्षा; मायलेकाच्या भेटीसाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

‘त्या’ बछड्याला आईची प्रतिक्षा; मायलेकाच्या भेटीसाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

Subscribe

सहा दिवस उलटूनही बिबट्याच्या आईचा शोध लागला नसल्यामुळे बछड्याची प्रकृती खालावत चाली आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय उद्यान पशुवैद्यकिय रूग्णालयातच ठेवण्यात आले आहे.

सहा दिवस उलटूनही बिबट्याच्या त्या बछड्याच्या आईचा अजूनही शोध लागलेला नाही. सध्या हा बछडा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचार घेत आहे. मात्र, मायलेकाची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. बछड्याच्या आईच्या शोधासाठी वनविभागाने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्या माध्यमातून वनविभागाचे कर्मचारी बछड्याच्या आईचा शेाध घेत आहेत.

नेमके काय घडले?

बुधवार ४ डिसेंबरला येऊरच्या परिसरात नेहमीप्रमाणे मॉनिंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना एअरफोर्स बसजवळ बिबट्याचा बछडा आढळून आला. अवघ्या २ दिवसांपूर्वी जन्मलेला हा बछडा चालण्याचा स्थितीत नव्हता. तो बछडा दिसतास नागरिकांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या बछड्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रूग्णालयात दाखल केले. त्या बछड्यावर उपचार केल्यानंतर तो खेळू लागला. पण त्या बछड्याच्या आईचा शोध घेऊन या मायलेकाची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाचे कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तिथल्या हालाचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने कॅमेरे लावले आहेत. बुधवारी काही सेकंदासाठी एक बिबट्या आला होता. मात्र, तो बछड्याला न घेताच निघून गेली होतो. त्यामुळे ती मादी होती कि नर याबाबत संशय व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम राबविल्यानंतर त्या बछड्याची प्रकृती खालावत असल्याने त्याला राष्ट्रीय उद्यान पशुवैद्यकिय रूग्णालयातच ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा बछडा आढळून आला त्याठिकाणी कॅमेरे लावले असून खरोखरच बछड्याची आई येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

बछडा ज्या ठिकाणी मिळून आला त्याठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. बछड्याच्या आईचा शोध सुरूआहे. लवकरच त्याच्या आईचा शोध लावून, या मायलेकाची भेट घडवली जाईल त्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. – राजेंद्र पवार, वनक्षेत्रपाल अधिकारी


हेही वाचा – अखेर एकनाथ खडसे म्हणाले, ‘…तर वेगळा विचार करावा लागेल’!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -