घरमुंबईविलेपार्ल्यातील माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांचे निधन

विलेपार्ल्यातील माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांचे निधन

Subscribe

शिवसेनेचे विलेपार्ले येथील माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांचे शुक्रवारी निधन झाले. दोन वेळा नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेचे निवडून आलेल्या पाटकर यांनी विलेपार्ल्यातील संस्कृती पुढे नेणारा पार्लेकर म्हणून ओळख असलेल्या कट्टर शिवसैनिकांचा गुरुवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.

विलेपार्ल्यात शिवसेनेचा गड राखणाऱ्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या शशिकांत पाटकर हे १९९७ साली प्रथम मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्यांना संधी मिळाली नाही. परंतु त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल स्कीम-परांजपे स्कीय या प्रभाग क्रमांक ७९ मधून निवडून आले होते. त्यानंतर प्रभाग आरक्षित झाल्यानंतर २०१२ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची पत्नी शुभदा पाटकर यांना निवडून आल्या होत्या. परंतु त्यांना २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटल्याने या मतदार संघातून शशिकांत पाटकर यांनी निवडणूक लढवली होती. भाजपचे अॅड. पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु २०१९ पुन्हा शिवसेना-भाजपची युती झाल्याने पाटकर यांची उमेदवारी हुकली आणि त्यांना युतीधर्म पाळत अळवणी यांचा प्रचारात भाग घेतला होता.

- Advertisement -

अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणसाठी शरयू नदीच्या तिरावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब महाआरती केली होती. यावेळी मुंबईसह उपनगरातही शिवसेनेकडूनही महाआरती आणि घंटानादचे आयोजन करण्यात आले होते. विलेपार्ले पूर्व कोलडोंगरी, शिवाजी चौक येथे शिवसेनेने महायज्ञ केला होता. यावेळी ‘शशिकांत पाटकर यांनी हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार’, असा मथळा लिहिलेल्या सुमारे ५० हजार आरती पुस्तकांचे वितरण केले होते. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या महाआरतीत हिंदुत्ववादी संघटना, धार्मिक संघटना, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक मंडळ व इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा –

मुंबईतील तळीरामांसाठी खुशखबर; उद्यापासून ऑनलाईन मद्यविक्री सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -