घरमुंबई'तो' लाखोंची नोकरी सोडून बनला चोर

‘तो’ लाखोंची नोकरी सोडून बनला चोर

Subscribe

सोनसाखळी चोरीचं काम करणारा 'तो' एकेकाळी एका मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडंट या हुद्द्यावर काम करत होता.

कोणाची वृत्ती कधी बदलेल, कुणाच्या मनात कधी काय आणि त्यामुळे त्याचं नशीब कधी पालटेल याचा काही नेम नसतो हेत खरं. कल्याणमध्ये काहीसा असाच प्रकार उघडकीला आला. वाशी येथील एका मल्टिनॅशनल कंपनीचा एकेकाळी उपाध्यक्ष असलेल्या एका व्यक्तीला कार जॅकिंग (चोरी) आणि साखळी चोरण्याच्याप्रकरणी अटक करण्यात आली. धक्काकदायक बाब म्हणजे ‘कौटुंबिक कारणामुळे महिना अडीच लाख रुपये पगार असलेली नोकरी सोडून, आपण चोरी करण्याकडे वळल्याचं, त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. सुमित सेनगुप्ता (३५) असं या आरोपीचं नाव असून, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. २०१५ मध्ये सुमितच्या पत्नीने त्याच्याविरोधात वाशी पोलिसांत छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती तपास अधिकारी विकास गायकवाड यांनी दिली आहे. गायकवाड यांच्या सांगण्यानुसार सुमित  वैयक्तिक कारणांमुळे त्रस्त होता. ‘नोकरी नसल्यामुळे एकेकाळी हाय-फाय स्टाईलने जगणाऱ्या सुमितला नोकरी सोडल्यानंतर पैशांची खूप उणीव भासू लागली होती.


वाचा: जरा जपून, ‘या’ पासवर्डवर हॅकर्सची नजर

सुमितने एका मोठ्या शैक्षणिक संस्थेतून इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं असून, तो पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. मात्र, नोकरी सोडल्यामुळे तो दारूच्या आहारी जाऊन अधिकच त्रस्त झाला होता.  तपास अधिकारी गायकवाड यांनी सांगितल्यानुसार, १२ डिसेंबरला त्यांनी वाशीमधून महिलेची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी सेनगुप्ता आणि त्याचा सहकारी नितीन अग्रवाल (२५) याला २४ तासांच्या आत अटक केली होती. हे दोघे चोरीची साखळी घेऊन एका चोरीच्याच गाडीतून जात होते. फोर्टिस रुग्णालयाबाहेर वाहन चालकाला मारहाण करुन सुमितने गुन्ह्यासाठी वापरलेली कार पळवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीतने ९ डिसेंबर रोजी सदर वाहनचालकाच्या डोक्याला पिस्तुलासारखी लोखंडी वस्तू लावून त्याला घाबरवले आणि त्याची गाडी चोरली. कार चोरल्यानंतर त्याने व त्याच्या साथीदाराने ३ दिवसांनी अर्थात १२ डिसेंबला वाशीतून महिलेची सोनसाखळी चोरली. २०१७ मध्येही अशाचप्रकारे सोनसाखळी चोरल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात सुमित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तपास अधिकारी सध्या सुमित विरुद्ध अन्य कुठे गुन्हा नोंदवला गेला नाही ना? याचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -