घरताज्या घडामोडीमाजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांना मारहाण

माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांना मारहाण

Subscribe

दरम्यान या मारहाणीत त्यांच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली आहे.  

एक राजकीय कार्यक्रम आटोपून घरी जात असताना अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील वाघमारे यांना अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंबरनाथ (पूर्व) येथील बी कॅबिन परिसरात बुद्धघोष या सोसायटीमध्ये सुनील वाघमारे (५३)  हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. काल सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास भाजपचा एक कार्यक्रम आटोपून ते कारने घराकडे येत असतांना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबविले, वाघमारे हे घराबाहेर आले असता त्या व्यक्तीने त्यांना बांबूने मारहाण केली, वाघमारे यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या हातातील बांबू हिसकावून घेतला असता तो पळून गेला. दरम्यान या मारहाणीत त्यांच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. सुनील वाघमारे हे २००० ते २००५ दरम्यान शिवसेनेतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, याच काळात त्यांना उपनगराध्यक्ष पद देखील मिळाले होते सध्या ते भाजपमध्ये सक्रिय आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -