घरमुंबईक्वारंटाईन सेंटरमध्ये आता मोफत जेवण

क्वारंटाईन सेंटरमध्ये आता मोफत जेवण

Subscribe

श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचा पुढाकार

वसई-विरार महापालिकेने क्वारंटाईन सेंटरमधील लोकांना दररोज दोनशे रुपयांचा भूर्दंड लादला होता. अखेर श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने सर्वच सेंटरमधील लोकांना सोमवारपासून सकाळचा नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवण मोफत पुरवण्यात येऊ लागले आहे. सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये साडेआठशेहून अधिक लोक असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांना महापालिका क्वारंटाईन करते. मात्र, क्वारंटाईनमध्ये असलेल्या प्रत्येकाकडून नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणापोटी महापालिका दोनशे रुपये आकारत होती. अनेकदा एकाच कुटुंबातील आठ-दहा लोक क्वारंटाईन झाल्यामुळे त्यांच्यावर दररोज मोठा आर्थिक बोजा पडत होता. महापौरांसह अनेक लोकप्रतिनिधींनी दोनशे रुपये घेऊ नये अशी मागणी केली होती. पण, आर्थिक स्थिती बिकट असल्याने फुकट जेवण देता येत नाही या भूमिकेवर महापालिका ठाम होती. त्यामुळे आयुक्तांवर टिका होऊ लागली होती.

- Advertisement -

अखेर श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने ओम साईधाम मंदिर ट्रस्ट विरार, विवा चॅरिटेबल ट्रस्ट,यंगस्टार ट्रस्ट यांच्या माध्यमातून सोमवारपासून म्हाडा विरार प., वागड हायस्कूल, सकवार (राष्ट्रीय महामार्गनजिक ),अगरवाल हॉस्पिटल ( गोलानी नाका, वालीव,) संत गोंसालो गार्सीया महाविद्यालय,( वसई ), रिद्धी विनायक हॉस्पीटल येथील सेंटरमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण पुरवण्यास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाश्ता आणि जेवण बनवले जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या भाज्या आणि कडधान्यांचा वापर जेवणासाठी केला जातो. या संस्थांमार्फत कोविडची लागण झाल्यापासून दररोज मोफत जेवण पुरवले जाते.

सध्या दिवसाला 35 हजार लोकांना दररोज जेवण दिले जात असून आतापर्यंत 55 लाखांहून अधिकना त्याचा लाभ झाला आहे. महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवण देण्याची आमची तयारी होती. पण, प्रशासनाचा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनी पत्र दिल्यानंतर सोमवारपासून ही सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती जीवदानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -