घरमुंबईपैशासाठी मित्रानंच काढला मित्राचा काटा! गळा आवळून हत्या

पैशासाठी मित्रानंच काढला मित्राचा काटा! गळा आवळून हत्या

Subscribe

उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे मित्रानंच दुसऱ्या मित्राची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारीतील तरुणाचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पैशाच्या व्यवहारातून हा खून झाला असून मित्र दत्ता नवनाथ बिरंगळ आणि समाधान बिभीषण भोगल यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तेजस सुनील भिसे असं खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी प्रवीण सुनील भिसे यांनी वाकड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तेजस भिसे याने आरोपी मित्र दत्ता बिरंगळला मैत्रीणीकडून घेऊन २० लाख उसने दिले होते. त्यासाठी मैत्रिणीने फ्लॅटवर कर्ज घेतलं होतं. काही महिन्यांनी मयत तेजसच्या मैत्रिणीकडे बँकेने पैशांसाठी तगादा लावला. तसे तेजसने संबंधित आरोपी दत्ता बिरंगळ याच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र, दत्ता बिरंगळ टाळाटाळ करू लागला. त्यामुळे याच पैशांच्या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले.

रुमालाने आवळला मयताचा गळा

मयत तेजस जुन्या गाड्यांचे खरेदी विक्रीचे काम करतो. खून होण्याच्या अगोदर तेजस बाहेरगावी जातो असं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने आरोपी ‘दत्ता बिरंगळ सोबत जात आहे’ असे मावस भाऊ नितेशला फोनवर सांगितले. आरोपी दत्ता बिरंगळ आणि समाधान भोगल यांनी मयत तेजसला होंडा सिटी मोटारीत जामखेड येथे नेऊन त्याचा रुमालाने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह जाळून टाकला.

- Advertisement -

हेही वाचा – अभिनेत्रीच्या छळाला कंटाळून सलून मॅनेजरची आत्महत्या!

..आणि आरोपीने दिली हत्येची कबुली!

दरम्यान, आरोपीनेच मयत तेजसच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅपद्वारे मावस भाऊ नितेशला स्वतः तेजस आल्याचं भासवत होंडा सिटी गाडी काळेवाडी येथे चावीसह सोडल्याचा मेसेज केला. त्यावेळेपासून तेजसशी संपर्क न झाल्याने सोबत असलेल्या दत्ता बिरंगळशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याचा फोन बंद येत असल्याने त्याने घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मयत तेजसच्या भावाने याची माहिती वाकड पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपीला अटक केली. आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता तेजसचा खून केल्याची कबुली संबंधित आरोपींनी दिली. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -