घरमुंबईआजपासून राज्यात वीजदरवाढ लागू

आजपासून राज्यात वीजदरवाढ लागू

Subscribe

राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी ३ टक्के वीजदरवाढ १ एप्रिल (आज)पासून सुरू होणार आहे. महावितरणला राज्य वीज नियामक आयोगाने एकूण सहा टक्के वीज दरवाढ मंजूर केली आहे. दोन टप्प्यांत ही वीज दरवाढ लागू करण्यात आली आहे. याआधीची ३ टक्के वीज दरवाढ सहा महिन्यांपूर्वी लागू झाली होती. तर उर्वरित ३ टक्केे वीज दरवाढ ही १ एप्रिलपासून अंमलात येईल. वीजबिलात इंधन समायोजन आकारणीचा समावेश होणार असल्याने ही वीजदरवाढ ६ टक्क्यांहून अधिक असेल असे वीज ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

वीज दरवाढ लागू झाल्यानंतर इंधन समायोजन आकारणी ही शून्य व्हायला हवी; पण वीज दरवाढीचे प्रमाण कमी दिसावे यासाठी दरवाढीमध्ये ही विभागणी करण्यात आली आहे. याचा परिणाम हा घरगुती वीज ग्राहकांच्या वीजबिलात प्रत्येक युनिटमागे ३६ पैशांपासून ते ५५ पैशांपर्यंत इंधन समायोजन आकारणी लागू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मागील दरवाजाने ही वीज दरवाढ लागू करण्याचा प्रकार असल्याचे प्रताप होगाडे यांचे म्हणणे आहे. राज्य सरकार आणि राज्य वीज नियामक आयोग यांनी निवडणुकीच्या तोंडावर वीज दरवाढीचा फटका ग्राहकांना बसू नये म्हणून अशी विभागणी करून वीज दरवाढ केली आहे. परिणामी सर्वसामान्य वीज ग्राहकांचे वीजबील हे सहा टक्क्यांनी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

थकीत रक्कम वसुली निवडणुकांनंतर

- Advertisement -

महावितरणच्या विवीध खर्चापोटी तुटीची रक्कम ही एप्रिल २०२० नंतर राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार वसूल करण्यात येणार आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. पण ही रक्कम उशिरा वसूल होणार असल्याचे नुसत्या व्याजापोटी २७६४ कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत, असे होगाडे यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -