घरताज्या घडामोडीमुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड झालेल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग

मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड झालेल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग

Subscribe

नागपूर-हैदराबाद चार्टर्ड विमानात तांत्रित बिघाड झाल्यामुळे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी घोषित केली होती. तांत्रित बिघाड झाल्यामुळे मुंबईतच्या हवेत विमानाच्या घिरट्या सुरू होत्या. प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गेअरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. या विमानात ५ ते ६ लोकांची उपस्थितीत होते. त्यामुळे मुंबई एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांपासून ते अग्निशमन दलाचे कर्मचारी सज्ज झाले होते. त्यामुळे तांत्रिक बिघाड झालेल्या या विमानाचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सुखरुप लँडिग झाले.

- Advertisement -

संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास हे विमान नागपुरहून हैदराबादच्या दिशेने जात होते. एअर अँब्युलन्स सारखे हे विमान असते. या विमानाला चार्टर्ड विमान देखील म्हटले जाते. हैदराबादच्या दिशेने जात असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. कारण मुंबईत ज्या मशिन आहेत, त्या आधुनिक स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने हे विमान वळवण्यात आले. यामुळे मुंबई विमानतळावर संपूर्ण टीम सज्ज झाली होती. पण आता या सुखरुप रित्या विमानाचे लँडिंग झाले आहे.

याबाबत एव्हिएशन एक्सपर्ट मंदार भारदे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘दिल्ली आधारित हे एअर अँब्युलन्स होते. त्याच्या लँडिंग गेअरमध्ये बिघाड झाली होती. लँडिंग गेअर हे ओपन होत नव्हते. एक ते दीड तासांपूर्वी अलर्ट आला होता की, हे विमान मुंबई विमानतळावर इमर्जन्स लँडिंग करेल. अशा प्रकारे लँडिंग करताना विमानाचे वजन कमी होणे महत्त्वाचे असते. एकतासभर विमान फ्लाय करून विमानाचे फ्यूल संपवले. जर विमानात जास्त फ्यूल असेल तर विमान ब्लास्ट होण्याची शक्यता असते आणि जेव्हा लँडिंग गेअर ओपन होत नाही तेव्हा ते टेली लँडिंग प्रकारे लँडिंग केले जाते. अशाच प्रकारे मुंबई विमानतळावर या विमानाचे लँडिंग झाले. विमानतळावर पूर्ण अलर्ट होते, सगळ्या यंत्रणा येथे सज्ज झाल्या होत्या. कोणत्याही प्रकारे आग किंवा स्फोट झालेला नाही आहे. सुरक्षित रित्या लँडिंग झाले आहे.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -