Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नाशिक महापालिका कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया; उद्या बैठक

नाशिक महापालिका कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया; उद्या बैठक

कोरोनामुळे दोन महिन्यांपासून लांबली होती प्रक्रिया; कर्मचार्‍यांचे बैठकीकडे लक्ष लागून

Related Story

- Advertisement -

महापालिका कर्मचार्‍यांच्या रखडलेल्या पदोन्नतीसाठी आता पुन्हा एकदा हालचाली सुरु झाल्या असून शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता कर्मचारी निवड समितीची बैठक होणार आहे. पालिका आयुक्त कक्षाजवळील हॉलमध्ये होणार्‍या या बैठकीकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, कोरोनामुळे दोन महिने ही बैठक लांबली होती.
महापालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कर्मचारी निवड समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अधीक्षक अभियंता संदीप नलावडे हे असून सदस्य म्हणून मुख्यलेखापरीक्षक बोधीकिरण सोनकांबळे, उपायुक्त प्रदीप चौधरी, मनोज घोडे पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. कल्पना कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी व कर्मचार्‍यांना ही पदोन्नती देण्यात येणार आहे. सध्या हापालिकेत ४ हजार ७१२ अधिकारी व कर्मचारीच कार्यरत आहेत. आकृतिबंधानुसार ७०८२ पदे मंजूर आहेत. यातील ३६८ पदे खुले आहेत. सुमारे २ हजार ३७० पदे रिक्त आहेत. प्रशासनाच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात ३५० रिक्त पदांवर पदोन्नतीची संधी देण्यात येणार आहे. प्रारंभीच्या काळात २०२०च्या वर्षअखेरपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले. हा मुहूर्त टळल्यावर स्थायी समितीच्या बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली. या वेळी सभापती गणेश गिते यांनी १० फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीसाठी अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्यक्षात कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीसंदर्भात छाननी प्रक्रिया बराच काळ सुरु होती. यात कास्ट व्हेरिफिकेशन, शैक्षणिक पात्रतेविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता या बाबींचा समावेश होता. त्यानंतर पदोन्नतीचा अहवाल आयुक्त कैलास जाधव यांच्यासमोर सादर करण्याची वेळ आली तेव्हा शासनाचा नवीन आदेश प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे छाननी प्रक्रियेत अधिकचे कर्मचारी समाविष्ठ होऊन पदोन्नतीची प्रक्रिया लांबणीवर पडली. नव्या आदेशानुसार महापालिकेत आता खुल्या गटातीलच नव्हे तर राखीव गटातही पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मागासवर्गीयांची बंद झालेली पदोन्नती आता पुन्हा सुरु होणार आहे. बिंदूनामावलीनुसार आरक्षीत संवर्गास पदोन्नती देण्यात येणार आहे. यापूर्वी न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे मागासवर्गीयांची पदोन्नती स्थगित करण्यात आली होती. ती आता पूर्ववत होणार आहे. त्यातच कोरोनाची दुसरी लाट जोरदार आल्याने अधिकारी वर्ग पूर्णत: या कामात व्यस्त होता. आता मात्र पदोन्नतीची प्रक्रिया पून्हा सुरु झाली आहे. शुक्रवारी (दि. ७) दुपारी १२.३० वाजता कर्मचारी निवड समितीची बैठक होणार आहे. पालिका आयुक्त कक्षाजवळील हॉलमध्ये होणार्‍या या बैठकीकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागून आहे.

 

- Advertisement -