घरमुंबईआश्वासनांच्या मुद्यावरून गडकरींचा यू टर्न

आश्वासनांच्या मुद्यावरून गडकरींचा यू टर्न

Subscribe

मी असे बोललोच नाही

मुंबई:-लोकसभा निवडणुकीत आम्ही निवडून येऊ असे आमच्यापैकी कुणालाही वाटत नव्हते. म्हणून हवी ती आश्वासने देण्यात आली. आता ही आश्वासने काय होती हे आठवत नाही, या वक्तव्याने अडचणीत आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दबाव येताच यू-टर्न घेतला आहे. मी असे काही बोललोच नाही, अशी पळवाट गडकरींनी स्वीकारली आहे. आश्वासने आणि पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या १५ लाखांबाबत मी काही बोललोच नाही, असे स्पष्टीकरण गडकरींनी दिले आहे.

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘अस्सल पाहुणे, इरसाल नमुने’, या कार्यक्रमात गडकरींनी, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची माहिती नाही, असे ठोकून दिले होते. आम्ही निवडून येऊ, असे अजिबात वाटत नव्हते. यामुळे हवी ती आश्वासने द्या, अशा सूचना पक्षाकडून कार्यकर्ते आणि नेत्यांना होत्या. निवडूनच येणार नसल्याने दिलेल्या आश्वासनांची जबाबदारी राहणार नाही, असेच वाटल्याने हवी ती आश्वासने देण्यात आली. आता ती पूर्ण करणे अवघड आहे, असे गडकरी म्हणाले होते.

- Advertisement -

गडकरींच्या या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फटकारे लगावले. भाजपची आश्वासने देण्यासाठी असतात, पूर्ण करण्यासाठी नसतात, असे राहुल यांनी ट्विट करताच गडकरी चांगलेच अडचणीत आले. भाजपने जनतेच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा सत्तेच्या हव्यासापोटी बळी दिला आहे, असं त्यांनी म्हटले आहे. राहुल यांच्यावर पलटवार करताना गडकरींनी राहुल यांना आधी मराठी शिकून घ्या, असा सल्ला देत स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

राहुल यांनी टीका केल्यावर फडणवीसांनी कोणती आणि आपण कोणती आश्वासने पूर्ण केली, याची माहिती गडकरींनी देण्याचा प्रयत्न केला. एकूणच आश्वासनांच्या मुद्यावर गडकरींची फजिती झाली आणि मी असे काही बोललोच नाही, असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुसरीकडे आश्वासनांच्या मुद्यातून पंतप्रधानांची सुटका करण्याचा पोरकट प्रयत्न भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच दिले नव्हते, असे भंडारी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

एकूणच आश्वासनांच्या मुद्यावर भाजपची बोलती बंद झाली असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. १५ लाखांसंबंधी मी ना मोदींचे नाव घेतले ना पक्षाचे. दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने पूर्ण निराधार वृत्त छापलं. त्यांनी ही बातमी छापल्यानंतर राहुल गांधींनी ती शेअर केली, असे गडकरी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -