घरमुंबईपनवेलच्या महागणपतीला मुंबईकरांची ‘सलामी’

पनवेलच्या महागणपतीला मुंबईकरांची ‘सलामी’

Subscribe

मुंबई सोमवारी बाप्पामय झाली होती. दाक्षिणात्य शैलीतील महागणपतीचे नयन मनोहारी रूप भक्तांना आकर्षित करीत होते.

पनवेल : वेळ दुपारची… मूर्तीकार राजन खातू यांच्या करीरोड कारखान्यातून बाप्पा निघणार म्हणून मुंबईकरांनी तहान-भूक हरपून ‘याची देही, याची डोळा’ पनवेलच्या महागणपतीचे लोभस असलेले रुपडे पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. महागणपती कारखान्यातून बाहेर पडताच मोरयाचा गजर करत लाखो हात फोटो काढण्यासाठी सरसावले.

मुंबई सोमवारी बाप्पामय झाली होती. दाक्षिणात्य शैलीतील महागणपतीचे नयन मनोहारी रूप भक्तांना आकर्षित करीत होते. मुंबापुरीतील छायाचित्रकार आणि तरुणांचे सळसळते चैतन्य ओसंडून वाहत होते आणि महागणपती भक्तांच्या प्रेममय गर्दीतून एक-एक पाऊल पुढे टाकत पनवेलच्या दिशेने पुढे सरकत होता. मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपायापासून ते आयपीएस अधिकारी वाहतूक नियंत्रण करण्यात मग्न झाले होते. सर्वच रस्त्यांवर बाप्पांची छाया पसरली असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. मात्र, मोबाईल आणि कॅमेराच्या झगमगाटात बाप्पा अधिक तेजोमय झाले होते.

- Advertisement -

दिवेकरांना गणपती बाप्पा पावला, कोकणात जाणार्‍या गाड्यांना थांबा

दिवा स्थानकात गणपती स्पेशल 5 गाड्यांना थांबा द्यावा, या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन्यात निवेदन दिले होते. याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने 8 सप्टेंबर रोजी स्थानकात काळ्या फिती लावून प्रवास करून तसेच पत्रके वाटून निषेध केला होता. याची रेल्वे विभागाने दखल घेत प्रवासी संघटनेची मागणी पूर्ण केली आहे.

मागील दोन वर्षांपासून एक नाममात्र स्पेशल गाडीला दिवा स्थानकात थांबा दिला जात होता. कोकणात जाणार्‍या स्पेशल गाड्यांपैकी सावंतवाडी आणि रत्नागिरीकडे जाणार्‍या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा, अशा मागणीचे पत्र 16 ऑगस्ट 2018 रोजी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना दिले होते. त्यानुसार काही गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

या गाड्या दिव्यात थांबणार

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई ते रत्नागिरी (01033)
  • लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते झारप (01039/01040)
  • सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई (01036)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -