घरमुंबईकांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये 'कचरा कोंडी'

कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये ‘कचरा कोंडी’

Subscribe

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमधील सफाई कामगारांनी 'काम बंद' आंदोलन पुकारले आहे.

कंत्राटदारांसाठी कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये साफसफाई आणि कचरा उचलण्याचे काम करणारे हजारो कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज ‘काम बंद’ आंदोलन पुकारणार आहे. त्यामुळे आज तिन्ही भागांमध्ये ‘कचरा कोंडी’ होण्याची शक्यता दिसून येत आहे. कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या हजारो नियमित कर्मचाऱ्यांना काम थांबवण्याचे आदेश देणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात कामगार आक्रमक झाले असून आज हजारो कामगारांनी ‘काम बंद’ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आज सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर २४ विभागांत काम बंद ठेवणार असल्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

मुंबईतील कचरा कमी झाल्यामुळे पालिकेने कचरा उचणाऱ्या गाड्यांची संख्या देखील कमी केली आहे. मात्र मुंबई कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असून हे कचऱ्याचे ढिग उचलण्यासाठी कंत्राटदारांकडून काम करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्रातदारांकडून कामे करुन घेतली जातात. मात्र अनेक वर्षांपासून नियमित आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सेक्रेटरी संजय वाघ यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सफाई कामगारांच्या मागण्या

सफाई कामगारांच्या असंख्य मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. सफाई विभागात अनेक पदे रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त भार पडत आहे. शिवाय कंत्राटी कामगारांना पुरेसे वेतनही दिले जात नाही. त्यामुळे पालिकेने या कामांसाठी कंत्राटदार न आणता या कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – सरकारी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पुकारणार काम बंद आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -