घरमुंबईशालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या

शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या

Subscribe

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात जिलेटीनच्या पाच कांड्या आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे लोकमान्य टर्मिनस परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य टिळक टर्मिनस परिसर पोलिसांनी रिकामा केला आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी जिलेटीन जप्त केले असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. मात्र जिलेटींनच्या कांड्या कशासाठी आणि कोणी आणल्या होत्या याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

- Advertisement -

सफाई कर्मचाऱ्यांना आढळून आल्या जिलेटीनच्या कांड्या

लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शालिमार एक्स्प्रेस आली होती. प्रवाशी उतरल्यांनंतर ही गाडी यार्डात साफसफाईसाठी आणण्यात आली होती. साफसफाई सुरू असताना गार्डच्या शेजारी असलेल्या सामान्य डब्यातील आसनाखाली सफाई कर्मचाऱ्यांना जिलेटीन कांड्या मिळून आल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी याची सूचना रेल्वे पोलिसांना दिली. कुर्ला रेल्वे पोलिसांनी जिलेटीन कांड्या ताब्यात घेतल्या असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिलॅटिन कांड्याचे पार्सल कोण आणि कुठून घेऊन चढले याचा तपास सुरू आहे. याची दखल राज्य दहशतवाद विरोधी पथकाने घेतली असून दहशतवाद विरोधी पथकाचे एक पथक लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दाखल झाले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -