घरदेश-विदेशएस. जयशंकर आणि रामविलास पासवान यांची राज्यसभेवर वर्णी?

एस. जयशंकर आणि रामविलास पासवान यांची राज्यसभेवर वर्णी?

Subscribe

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेतील भाजपच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागांवर एस. जयशंकर आणि रामविलास पासवान यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

भाजपचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना राज्यसभेत आणण्यासाठी बिहारमधून राजगकडून उमेदवारी मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि स्मृती ईराणी यांची केंद्रातील मंत्रीमंडळात नियुक्ती झाल्यानंतर राज्यसभेतील भाजपच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागांवर एस. जयशंकर आणि रामविलास पासवान यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

गुजरातमधून उमेदवारीची शक्यता 

केंद्रीय मंत्रीपदाच्या नियुक्तीनंतर रामविलास पासवान आणि एस. जयशंकर यांची सहा महिन्याच्या आत संसदेतील दोनही सभांपैकी कोणत्या तरी एका सभेवर नियुक्ती होणे आवश्यक आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोनही मंत्र्यांची राज्यसभेवर निवड होण्याती शक्यता आहे. कारण बिहारमध्ये राजगला पूर्ण बुहमत मिळाले असून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा एस. जयशंकर यांना तामिळनाडूमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण याच वर्षातील जुलै महिन्यात राज्यसभेतील सहा जागा रिक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

पुण्यातील वनखात्याच्या कार्यालयात बॉम्बचा स्फोट

शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -