घरमुंबईभारनियमनावरील तोडग्यासाठी कचर्‍यापासून वीज निर्मिती

भारनियमनावरील तोडग्यासाठी कचर्‍यापासून वीज निर्मिती

Subscribe

देशातील ग्रामीण भाग भारनियमनापासून त्रस्त आहे, तर शहरात जमा होणार्‍या कचर्‍यापासून वायू प्रदूषण वाढत आहे. या दोन्ही महत्त्वाच्या समस्यांवर उपाय म्हणून आयआयटी मुंबईचे प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्याच्या संशोधन टीमने कचर्‍यापासून तयार होणार्‍या द्रवाचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास आणि भार नियमन या दोन्हीच्या त्रासापासून भविष्यात मुक्ती मिळणार आहे.

भारतातील बहुतेक शहरांमध्ये कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि जल प्रदूषण होत आहे. याचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत असून, याचा परिणाम आता मानवी जीवनावरदेखील पहावयास मिळत आहे, तर ग्रामीण भागांमध्ये कचरा नाही पण त्या ठिकाणी विजेच्या भारनियमनची मोठी समस्या आहे. जवळपास १५ तास भारनियमन ग्रामीण भागात केले जाते. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय आयआयटीमधील प्राध्यापक टीमकडून करण्यात आला. यामध्ये कचरा साचून त्यातून जमा होणार्‍या द्रवापासून वीज बनविण्याचा यशस्वी प्रयोग करून त्याचा एक अहवाल सादर केला आहे.

- Advertisement -

कचरा डेपोमध्ये पावसाचा पाणी झिरपूण कचर्‍यातील आद्रतेमुळे किंवा भुजलाच्या गळतीमुळे गडद रंगाचे द्रव निर्माण होते. या द्रव्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. मात्र, या द्रव्यामध्ये अनेक प्रकारचे ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक रसायने असतात. त्याच्या विघटनातून ऊर्जा मिळू शकते आणि या उर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी तयार करण्याचा प्रस्ताव आयाआयटीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रक्रियेमध्ये सुक्ष्मजीवाणू जैव पदार्थाचे ऑक्सीडीकरण करतात या त्तत्वावर सुक्ष्मजीवाणू इंधन सेल काम करतात.

या सेलच्या धनाग्र आणि ऋणाग्राच्यामध्ये एक पातळ पटल असते ज्यातून धन विदल प्रवाहित होऊ शकतात. हा संपूर्ण संच एका द्रावणात बुडविला जातो. या द्रावणात मोठ्या प्रमाणात सुक्ष्मजीवाणू आणि जैव संयुगे असतात. जेव्हा सुक्ष्मजीवाणू संयुगांचे विघटन करतात तेव्हा धन प्रभार आणि ऋण प्रभार असलेले कण निर्माण होतात. हे कण विरुध्द प्रभार असलेल्या अग्रांकडे आकर्षित होतात. प्रभार असलेल्या या कणांच्या प्रवाहामुळे वीज निर्माण होते. या प्रक्रियेत आतापर्यंत ५३४ मिनीव्होलटेज तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

सांडपाण्यावरील प्रक्रियेचा खर्च कमी करणे आणि कचर्‍यातून मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्यावर शोध सुरू आहे. या सर्व समस्यांचे समाधान जैव कचरा आणि अक्षय जैव साहित्य वापरून ऊर्जा निर्माण करणे आहे. कचरा डेपोमध्ये तयार होणार्‍या द्रवावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करता येते.
– जयेश सोनवणे, संशोधक, आयआयटी मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -