घरमुंबईघाटकोपर- अंधेरी लिंकवर भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू

घाटकोपर- अंधेरी लिंकवर भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू

Subscribe

अपघाताप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रास्तारोको केला.

घाटकोपर – अंधेरी लिंक रोडवर भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मीनगरजवळ भरधाव ट्रकने बाईकला धडक दिली. या अपघातामध्ये बाप-लेकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद रजा जमील सय्यद (७ वर्ष) आणि मोहम्मद जमेल बशीर सय्यद (३५ वर्ष) अशी अपघात मृत्यू झाला आहे. मोहम्मद जमेल बशीर सय्यद त्यांच्या सात वर्षाच्या मुलाला शाळेत घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रास्तारोको केला. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

स्थानिक नागिराकांचा रास्तारोको

भरधाव आलेल्या ट्रकने बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर संतप्त जमावाने रस्ता रोको केला आणि ट्रक चालकाला पंतनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. संतप्त झालेल्या आंदोलकांना बाजूला काढून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा या घाटकोपर – अंधेरी लिंक रोडवरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर काही वर्षापूर्वी शाळकरी मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघाताप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -