घरमुंबईगोपाळ शेट्टींचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट

गोपाळ शेट्टींचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट

Subscribe

उत्तर मुंबईचे भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टी यांचे उत्पन्न ४ लाख १८ हजार एवढे होते. त्यातुलनेत पाच वर्षांनी त्यांचे उत्पन्न आता ८ लाख ४ हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर त्यांची पत्नी उषा शेट्टी यांच्या नावावर स्थावर मालमत्ता अधिक प्रमाणात असली तरी त्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येते. पाच वर्षांपूर्वी पावणेसहा लाखांचे उत्पन्न असलेल्या उषा शेट्टी यांच्या उत्पन्नात घट होवून ते आता ३ लाख २७ हजारांवर पोहोचले आहे.

शेट्टींकडे आहे ऐवढा पैसा

गोपाळ शेट्टी यांच्याकडे ३ लाख २४ हजार ९४८ रुपयांची रोख रक्कम असल्याचे तर त्यांची पत्नी उषा यांच्याकडे ९ लाख १४ हजार ६३६ रुपयांची रोख रक्कम असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. गोपाळ शेट्टी यांच्या नवी दिल्लीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात १३ लाख ४१ हजार २२२ रुपये, ओशिवरा शाखेतील डेव्हलपमेंट बँकेत ६८ हजार रुपये आणि बोरीवलीतील शाखेत जनसेवा बँकेत ३ लाख ११ हजार ८१२ रुपयांची रक्कम खात्यात जमा आहे. तर त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात बोरीवली शाखेतील ओरिएंटल बँकेत ७६.१६ लाख रुपये आहेत. तर शेअर्सच्या माध्यमातून दहा लाखांची गुंतवणूक केलेली आहे.

- Advertisement -

गोपाळ शेट्टीच्या नावे १ कोटी ५५ लाखांचे कर्ज

शिवाय, त्यांच्या नावे १ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्जही आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे २ कोटी ६० लाख ३१ हजारांचे कर्ज आहे. गोपाळ शेट्टी यांच्या नावे १२ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे २७ लाख ९९ हजारांचे दागिने आहे. त्यामुळे शेट्टींच्या नावे एकूण २ कोटी ५ लाख रुपये तर पत्नीच्या नावे ३ कोटी ८४ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम, बॅक जमा व सोने स्वरुपात मालमत्ता आहे.

शेट्टी कुटुंबियांकडे १६ कोटींची मालमत्ता

शिवाय इतर स्थावर मालमत्ता अशाप्रकारे गोपाळ शेट्टींच्या नावे ७७ लाख ११ हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या नावे ९.०४ कोटींची आहे. त्यामुळे शेट्टींच्या नावे एकूण पावणे तीन कोटी रुपये तर पत्नीच्या नावे सुमारे १३ कोटी रुपये अशाप्रकारे सुमारे सोळा कोटी रुपयांची मालमत्ता शेट्टी कुटुंबाकडे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -