घरमुंबईमुंबईत पुन्हा सेक्स रॅकेट उघड, बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक

मुंबईत पुन्हा सेक्स रॅकेट उघड, बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक

Subscribe

मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. त बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील वेस्टिन हॉटेलमध्ये छापे टाकत पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडे केले आहे. गोरेगावमधील संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली. त्यावेळी दोन अभिनेत्रीही तिथे सापडल्यामुळे बॉलिवूड जगतात एकच खळबळ उडाली आहे. त्यातील एक अभिनेत्री बिग बॉसमधील स्पर्धकाची एक्स गर्लफ्रेंड आहे.

डीसीपी डॉ. डी स्वामी यांच्या नेतृत्वात हे सेक्स रॅकेट उघड करण्यात यश आले. खोटा ग्राहक पाठवत सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांशी संपर्क करण्यात आला, आणि पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. यावेळी या दोन अभिनेत्री रंगेहाथ सापडल्या. २०२० या वर्षात मुंबईत सेस्क रॅकेट उघड होण्याची दुसरी वेळ आहे. या आधी पाच जानेवारीला दहीसरच्या गिरी निवास रावळपाडा भागात चालणाऱ्या सेक्स रेकॅटमधून तीन मुलींची सुटका झाली होती. तर एका दलाला अटक करण्यात आली. दोन मुली पश्चिम बंगालच्या होत्या, तर एक तरुणी ही बांगलादेशाची असल्याचं समोर आलं होतं. तिच्याकडे बांगलादेशाचा पासपोर्ट आणि व्हिसाही सापडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -