घरमुंबईआता लवकरच हार्बर लोकल बोरिवलीपर्यंत धावणार

आता लवकरच हार्बर लोकल बोरिवलीपर्यंत धावणार

Subscribe

आता लवकरच हार्बर सेवेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.

बोरिवलीकरांकरता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता हार्बर सेवेचा बोरिवलीपर्यंत विस्तार केला जाणार आहे. या मार्गाच्या विस्ताराकरिता गोरेगाव ते बोरिवली दरम्यान ड्रोन सर्वेक्षणाला पश्चिम रेल्वेने सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यासाठी सल्लागारही नियुक्त केला जाणार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रवाशांना होणार फायदा

सध्या गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर सेवेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रस्ताव आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.सध्याच्या स्थितीत हार्बर मार्ग सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगावपर्यंत आहे. त्यामुळे बोरिवलीला राहणारे प्रवासी अनेकदा गोरेगाव किंवा अंधेरीपर्यंत प्रवास करुन नंतर ते पश्चिम रेल्वेने प्रवास करतात. मात्र, बोरिवलीपर्यंत सेवा सुरु झाल्याच अनेक चाकरमान्यांना त्याचा फायदा होणार आहे.

- Advertisement -

गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर सेवेला उत्तम प्रतिसाद

अंधेरी ते गोरेगाव हार्बर विस्ताराच्या कामाला २००९ साली सुरुवात करण्यात आली. परंतु, अनेक अडचणींमुळे हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर २०१७ वर्षे उजाडले. त्यामुळे ८८ कोटी रुपये असलेला प्रकल्प तब्बल १२४ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. मात्र, प्रत्यक्षात या मार्गावरुन गोरेगावपर्यंत लोकल गाड्या मार्च २०१९ पासून धावू लागल्या. तसेच या सेवेला देखील उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर सेवेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पासाठी ८२६ कोटी रुपये खर्च

‘एमयूटीपी-३ ए’मध्ये गोरेगाव ते बोरिवली हार्बर विस्ताराचा समावेश केला गेला. ‘एमयूटीपी-३ ए’ला मंजुरी मिळाल्यानंतर विस्ताराच्या कामाला गती देण्यास सुरुवात झाली असून ७ किलोमीटर लांबीच्या असलेल्या या प्रकल्पासाठी ८२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या किमान तापमानात ३ अंशाने घट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -