घरमुंबईहार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत; टिळकनगर – चेंबूर दरम्यान रुळाला तडे

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत; टिळकनगर – चेंबूर दरम्यान रुळाला तडे

Subscribe

हार्बर रेल्वेच्या टिळकनगर – चेंबूर स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वेच्या टिळकनगर – चेंबूर स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. १५ ते २० मिनिटे वाहतूक विस्कळीत झाल्यमुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूकीवर परिणाम

आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास टिळकनगर – चेंबूर मार्गावर रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेचा खोळंबा सुरु असताना आज टिळकनगर – चेंबूर स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक २० ते ३० मिनिटे उशीराने सुरु आहे. पहाटेच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कार्यालयात निघालेल्या नोकरदारांची मोठी कोंडी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -